![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/Untitled-design-23-380x214.jpg)
Mumbai Local: मुंबई लोकल ट्रेनने आता सर्वसामान्यांना सुद्धा प्रवास करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे. मात्र त्यासाठी ठराविक वेळा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर वेळ चुकल्यास दंड भरावा लागेल असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच आता मुंबई शहरात कोरोनाच्या रुग्णांचा वेग सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मंदावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास येत्या 15 दिवसात लोकलच्या वेळापत्रकात बदल केला जाईल असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.(Mumbai Local च्या वेळेत सामान्य नागरिकांसाठी बदल होणार? पहा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया)
याआधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचे संकेत दिले होते. पण आता काकाणी यांनी कोरोनाची पुढील 15 दिवसांची परिस्थिती पाहून लोकलच्या वेळांबद्दल निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे. यामुळे सर्व नागरिकांना दिलासा सुद्धा मिळणार असून कामाच्या वेळेत ही पोहचण्यास मदत होईल हे नक्कीच.(Mumbai Local प्रवाशांना दिलासा! लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या पासमध्ये मिळणार मुदतवाढ)
दरम्यान,सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसाठी वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना सकाळी 7 वाजताची पहिली ट्रेन, त्यानंतर 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलने प्रवास करता येणार आहे. परंतु लोकलच्या या वेळा चुकवल्यास तर प्रवाशाला 200 रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत सरकारी सुचनांचे पालन न केल्यास कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.