Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल (Mumbai Local)  1 फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. पण त्यावर वेळेचं बंधन आहे. पहाटे पहिली लोकल ते 7 नंतर 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर अशा वेळेतच मुंबईकरांना लोकलचा वापर करता येत आहे. पण या वेळा अनेक नोकरदारांच्या ऑफिसच्या वेळांशी सुसंगत नसल्याने त्यांचा फायदा होत नसल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. जेव्हा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी ' सहाजिकच लोकांची सोय देखील बघावी लागेल.' असं म्हणत लोकलच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतात असे संकेत मीडीयाशी बोलताना दिले आहेत. Mumbai Local for General Public: लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी रेल्वेच्या तिजोरीत 2.09 कोटी रुपयांची भर; पहा पहिल्या दिवशी काय घडलं?

राजेश टोपे यांनी आरोग्य विभाग त्याबद्दल सरकारला माहिती देईल. पुढे प्रशासन त्यावरून निर्णय घेऊन निश्चितच रेल्वेच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या भूमिकांबद्दल विचार करू शकते असे म्हणाले आहे. पण मुंबईचे उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अद्याप कोरोनाचं संकट टळलेले नाही. त्यामुळे सुरूवातीला गैर सोय होणार पण लोकांचा जीव वाचवणं ही प्राथमिकता असल्याने लोकलच्या वेळांबाबत असे निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केले आहे. अनेक देशांत शून्यापर्यंत खाली गेलेल्या कोरोना केसेस झपाट्याने वाढल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्यानेच सेवा पूर्ववत केल्या जातील असे ते ABP Majha शी बोलताना म्हणाले आहेत. (वाचा - मुंबई करांना लोकल प्रवासाची मुभा मिळताच पहिल्या दिवशी CSMT स्टेशन मध्ये पहा काय आहे स्थिती (Watch Video).

दरम्यान काल पहिल्याच दिवशी सुमारे 7 लाख मुंबईकरांनी लोकलने प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान अनेक स्थानकांमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी पहायला मिळाली आहे. रेल्वेच्या नियमावलीनुसार मास्क घालणं प्रवासादरम्यान गरजेचे आहे. तसेच नेमून दिलेल्या वेळेतच प्रवास करायचा आहे. अन्यथा प्रवाशाला दंड आकारला जाऊ शकतो.