मुंबईकरांची लाइफलाईन असलेल्या 'मुंबई लोकल' मधून नागरिकांना प्रवास करण्याची आज (1 फेब्रुवारी) पासून मुभा मिळाली आहे. पण सामान्य मुंबईकरांना वेळेचं बंधन असल्याने नेमका किती जणांना त्याचा फायदा होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला आहे. आज पहिल्याच दिवशी दक्षिण मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकांत लोकांची पूर्वी प्रमाणेच गर्दी पहायला मिळाली आहे. दरम्यान जसा लॉकडाऊन शिथिल झाला आहे तशी सामान्यांची सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सवय मागे पडत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आजही नागरिक मोठ्या गर्दीत फिरताना दिसत आहेत.
पत्रकार राजेंद्र अकलेकर यांनी @rajtoday या त्यांच्या ट्वीटर अकाऊंट वरून सीएसएमटी स्टेशन वरील दुपारी 3.30 च्या परिस्थितीचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने आजपासून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार, दादर स्थानकात प्रवाशांची दिसली गर्दी.
सध्याच्या रेल्वेच्या नियमांनुसार, सामान्य नागरिक पहाटेची पहिली लोकल ते 7, दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 ते शेवटची लोकल असा प्रवास करू शकतात. मधल्या वेळेत म्हणजे 7-12 आणि 4-7 ही वेळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी आहे. यावेळेत समान्य नागरिक प्रवास करताना आढळला तर त्यांना शिक्षा होऊ शकते असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सीएसएमटी स्टेशन मधील स्थिती
#MumbaiLocalTrainDay1 Like a normal day at Mumbai CSMT station. General public time at 3:30pm @mid_day pic.twitter.com/LHbxKjOTvd
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) February 1, 2021
आजपासून सामान्य नागरिकांना मुंबई लोकल पुन्हा खुली करण्यात आली आहे. यामध्ये युटीएस अॅपच्या माध्यमातून लोकांना तिकीट बुकींगची देखील सोय आहे. जुना पास जर राहिला असेल तर त्याला देखील वैध मानले जाणार आहे. मुंबई मध्ये लॉकडाऊन पूर्वी 8 मिलियन लोकं प्रति दिवस ट्रेन ने प्रवास करत होते.