Mumbai Local E-Pass: रेल्वेप्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ई- पास सुविधा उपलब्ध, 'या' पद्धतीने करता येईल अर्ज
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai Local E-Pass:  मुंबईकरांना येत्या 15 ऑगस्ट नंतर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी अट सुद्धा घालण्यात आली आहे. त्यानुसार कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. त्यासाठी रेल्वेस्थानकात मासिक पास दिले जात आहेत. यासाठी मात्र पडताळणी केल्यानंतरच ते दिले जाणार आहेत. याच पार्श्वभुमीवर आता राज्य सरकारने ई-पासची सुद्धा सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.(Maharashtra Unlock Update: 15 ऑगस्टपासून राज्यातील रेस्टॉरंट/भोजनालये रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय)

सरकारने सुरु केलेल्या पासला युनिव्हर्सल पास असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत तुम्हाला रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. तर जाणून घ्या ई-पास मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे.(Door-to-Door Vaccination Drive: मुंबईत BMC च्या अंथरूणाला खिळलेल्यांना घरी जाऊन लस देण्याच्या उपक्रमात एकावरही दुष्परिणाम नाही; पालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक)

>>ई-पास काढण्यासाठी कसा अर्ज कराल?

-ई-पाससाठी अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला https://epassmsdma.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.

-आता तुम्ही लस घेताना जो मोबाईल क्रमांक दिला होता तो आता येथे सुद्धा द्यावा लागणार आहे.

-तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.

-ओटीपी दिल्यानंतर आता तुमचा फोटो अपलोड करावा लागणार आहे.

-ही प्रक्रिया केल्यानंतर पुढील 48 तासात एक मेसेज येईल. एसएमएस आल्यानंतर तुम्हाला ई-पास डाऊनलोड करता येणार आहे.

Tweet:

ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या सहज करु शकता. त्यासाठी रेल्वेस्थानकात तुमचे प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांसह पडताळणी करण्यासाठी जावे लागणार नाही आहे. ई-पास तुम्ही एकदा डाऊनलोड केला की तो रेल्वे स्थानकातील तिकिट विंडोवर दाखवल्यानंतर तुम्हाला मासिक पास दिला जाणारआहे.