Mumbai Hit-and-Run Case: मुंबई हिट-अँड-रन प्रकरण;  अंधेरी उड्डाणपुलावर वाहनाने धडक दिल्याने 19 वर्षीय धावपटूचा मृत्यू, आणखी एक जखमी
Hit-and-Run Case प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Mumbai Hit-and-Run Case: पुण्यानंतर आता मुंबई शहरातील अंधेरी (Andheri) उपनगरात हिट-अँड-रन प्रकरण (Hit-and-Run Case) समोर आलं आहे. शनिवारी पहाटे 5.30 च्या सुमारास अंधेरी फ्लायओव्हर (Andheri Flyover) वरून धावत असताना एका वाहनाने धडक दिल्याने एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा 18 वर्षीय भाऊ जखमी झाला. या धडकेमुळे विवेक यादव उड्डाणपुलाच्या भिंतीवरून 35 फूट खाली रस्त्यावर पडला. तसेच अभयच्या पायाला दुखापत झाली. सुमारे अर्ध्या तासानंतर, अंधेरीतील एका सायकलस्वाराच्या ताफ्याने फ्लायओव्हरवर जखमी अभयला पाहिला. त्याचा खालचा पाय सुजला होता, ज्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता होती.

या धडकेमुळे विवेक यादव (19) उड्डाणपुलावरून खाली पडला, तर अमन यादव (18) याचा पाय फ्रॅक्चर झाला. तत्काळ वैद्यकीय उपचार करूनही विवेकचा शनिवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिस हिट-अँड-रनमध्ये सामील असलेल्या वाहनाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासत आहेत. (हेही वाचा -Mumbai Hit And Run Case: कारच्या धडकेत भटक्या कुत्र्याचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)

अंधेरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संताजी घोरपडे यांनी सांगितले की, त्यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 304-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस घटनास्थळाचे आणि रस्त्यालगतच्या इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून कारचालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा - Pune Hit And Run Case: पुण्यात पोर्शे कारने घडक देत दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन चालकाला जामीन)

ही घटना रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करते. तसेच वाहनचालक आणि पादचारी यांनी रस्त्यावरून चालताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याची गरजही अधोरेखित करते. दरम्यान, धावपटू विवेक यादव यांच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून लवकरचं अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यात येईल, असं आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिलं आहे.