Street Dogs | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Mumbai Hit And Run Case: भटक्या कुत्र्याला ठार मारल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारने जोरदार धडक दिल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. धडकेत कुत्र्याच्या पाठीला आणि तोंडाला दुखापत झाली. त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संतापजनक घटनेनंतर वकिल निधी हेगडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर परिसरातील प्राणी प्रेमींनी शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा- एमीटी युनिव्हर्सिटीत प्रियकराकडून तरुणीला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद)

मिळालेल्या माहितीनुसार,  12 जून रोजी कांदिवली येथील रहिवासी येथील अक्षय गंगावणे यांनी निधा यांना फोन करून माहिती दिली. फोनवर त्यांनी सांगितले की, काळ्या कुत्र्याला एका स्कॉर्पिओ कारने बेधडकपणे उडवले. उपस्थित असलेल्या लोकांनी कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू कार चालकाने कार जोरात पळवली आणि घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत कुत्रा गंभीर जखमी झाला.

स्थानिकांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु गंभीर अवस्थेतमुळे त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती वकिल निधी हेगडे यांना देण्यात आली. निधी हेगडे यांनी कांदिवली येथील समतानगर पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारदाराने सांगितले की, कुत्रा १४ वर्षापासून गोपीनाथ मुंडे गार्डन परिसरात राहायचा. परिसरातील अनेक प्राणी प्रेमी त्यांनी जेवायला देत असे.

चालकाने कार बेधडकपणे चालवली त्यामुळे त्याला धडक लागली आणि त्याचा मृत्यू झाला.  समता नगर पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवला. पोलिसांनी ड्रायव्हर विनय पाल आणि गौरव गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरात कुत्रा प्रेमांनी हळहळ व्यक्त केली आहे.