राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (National Bravery Award) मानकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. मंबई येथील झेन सदावर्ते (Zen Sadavarte) तर औरंगाबाद (Aurangabad) येथील आकाश खिल्लारे (Akash Khillar) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या रुपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांचे वितरण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी करण्यात येते. आगीतून 17 जणांना सुखरुप बाहेर काढल्यामुळे झेन सदावर्ते चर्चेत आला होता. तर नदीत बुडणाऱ्या मायलेकरांची सुटका केल्यामुळे आकाश याचे कौतुक केले जात होते. राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी देशभरातून एकूण 22 जनांची निवड झाली आहे. त्यात 10 मुली आणि 12 मुलांचा संमावेश आहे.
कोण आहे झेन सदावर्ते?
22 ऑगस्ट 2018 या दिवशी (बुधवार) मुंबई येथील हिंदमाता परिसरात क्रिस्टल टॉवर इमारतीला आग लागली. या आगीत 4 जण मृत्यूमुखी पडले. तर 18 जन जखमी झाले. दरम्यान, याच आगीतून झेन सदावर्ते यांनी प्रसंगावधान दाखवत तब्बल 17 जणांचा जीव वाचवला. या धाडसामुळे झेन जोरदार चर्चेत आली होती. तिच्या धाडसाचे कौतुक केले जात होते. झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायलयातील अॅड. गुणवंत सदावर्ते यांची मुलगी आहे. झेन आपल्या कुटुंबासोबत क्रिस्टल टॉवरच्या 16 व्या मजल्यावर राहात असे. या इमारतीला आग लागली तेव्हा झेन हीने घाबरुन न जाता घरातल्यांना शांत केले. तसेच, सुती कापड ओले करुन ते नाकाला धरुन श्वास घेण्यास सांगितले. ज्यामुळे कुटुंबीयांसह इतरांचे प्राण वाचले. झेन ही डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी आहे. शाळेत आपत्तीनिवारणाचे मिळालेले ज्ञान तिने ऐनवेळी चपकल वापरल्याचे दिसून आले होते.
कोण आहे आकश खिल्लारे?
आकाश खिल्लारे या मलानेही स्वत:चा जीव धोक्यात घालून 70 फूट नदीत बुडत असलेल्या मायलेकरांचा जीव वाचवला होता. औरंगाबाद येथील हातमळी या छोट्याशा गावात राहणारा हा मुलगा शाळेला निघाला होता. नदीचा बंधारा ओलांडत असताना त्याला आपल्याच गावातील एक लगान मुलगी आणि तिची आई पाण्यात बुडत असल्याचे दिसले. या वेळी त्याने इतर कोणताही विचार न करता थेट नदीच्या डोहात उडी घेतली आणि बुडत असलेल्या 'त्या' मायलेकीला वाचवले. (हेही वाचा, अबब! तब्बल 6 फुट लांब केसांचा विश्वविक्रम; भारताच्या निलांशी पटेलचे नाव Guinness World Records मध्ये सामील)
दरम्यान, अत्यंत धाडसी काम करणाऱ्या आणि इतरांच्या उपयोगी येणाऱ्या 16 वर्षाखालील मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. देशभरातून सुमारे 25 मुलांची या पुरस्कारासाठी निवड होते. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप असते. हा पुरस्कार प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी या दिवशी दिले जातात.