Mumbai: पाण्यामधून होत आहे Covid-19 चा प्रसार? BMC करणार सांडपाण्याच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

याआधी अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले होते की, पाण्यामधूनही कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग पसरू शकतो. आता कोविड-19 पाण्यामधून पसरत आहे की नाही हे शोधण्यासाठी, आपल्या अभ्यासाला गती देत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ने आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे यांना जुलै 2020 पासून एजन्सी गोळा करत असलेल्या सांडपाण्याचे नमुने पाठवण्याची विनंती केली आहे. आरटी-पीसीआर चाचणीनंतर कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आलेले नमुने पाठवण्याची विनंती नागरी संस्थेने एनआयव्हीला केली आहे. या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची प्रस्तावित आहे.

बीएमसीने एनआयव्हीला मुंबईतून विशेषत: शहरातील रुग्णालयांजवळील भागातून नमुने गोळा करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शहरातील सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी 16 क्षेत्रे ओळखली आहेत. नागरी संस्थेने समुदायामध्ये कोविड-19 चा प्रसार समजून घेण्यास सुरुवात केल्यानंतर ही वापले उचलली गेली आहेत.

आकडेवारीनुसार, एनआयव्हीने जुलै 2020 पासून आतापर्यंत 2000 हून अधिक नमुने गोळा केले आहेत, त्यापैकी 60 ते 70 हून अधिक नमुने पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांच्यावर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी सांगितले होते की, जवळ जवळ संपूर्ण शहरात कोविड प्रकरणे आढळून आली आहेत त्यामुळे संपूर्ण शहराचे जीनोम सिक्वेन्सिंग करता येत नाही. यानंतर, बीएमसीने एनआयव्हीला सकारात्मक सांडपाणी नमुने शेअर करण्याची विनंती केली जी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी वापरली जाऊ शकते.

काकाणी यांनी सांगितले की, ‘आम्ही गेल्या वर्षी ऑगस्टपासून जीनोम सिक्वेन्सिंग करत आहोत आणि सध्या आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ आहे जे या अभ्यासासाठी वापरता येईल. त्यामुळे आम्ही एनआयव्हीला आरटी पीसीआर आणि जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने वाटून घेण्यास सांगितले. यावरून दिसून येईल की, कोविड -19 चा कोणता नवीन प्रकार आहे की नाही, जो शहरावर परिणाम करू शकतो. (हेही वाचा: Central Railway: मुंबईत रेल्वे स्थानकांवर सलून सेवा सुरू, पार्लरसारख्या सेवा होणार उपलब्ध)

दरम्यान, एखाद्या व्यक्तीला कोविड-19 ची लक्षणे दिसण्यासाठी तीन ते 14 दिवस लागतात, परंतु सांडपाण्यात त्याची उपस्थिती लवकर दिसून येते. हे समाजातील कोरोनाचे व्हेरिएंट जलद ओळखण्यास मदत करते. भारतात, तिसरी लाट कमी होत असताना, आता नवीन संभाव्य व्हेरिएंटसाठी सतर्क राहण्याची वेळ आहे.