मुंबई महापालिकेने केलेल्या 9 दिवसांच्या तपासणी मोहिमेदरम्यान 1146 डेंग्यू तर 333 ठिकाणी मलेरिया डासांच्या अळ्या सापडल्या
( फोटो सौजन्य- गुगल)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा वाढत असल्याने परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची याबाबत पावले सरकारकडून उचलली जात आहेत. तसेच कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसून वैज्ञानिकांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे महासंकट असताना आता मुंबई महापालिकेने नऊ दिवसात एक मोहिम राबवली होती. या मोहिमेदरम्यान 1 हजार 164 ठिकाणी डेंग्यू (Dengue) आणि 333 ठिकाणी मलेरिया (Malaria) वाहक डासांच्या अळ्या सापडल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यात खासकरुन नागरिकांना डेंगू आणि मलेरियाचा आजार होण्याची शक्यता फार असते. कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाचे डास त्यामध्ये आपली अंडी घालत असून त्यामधून अधिक डासांची उत्पत्ती होते. या मधील एखादा जरी डास व्यक्तीला चावल्यास त्याला डेंग्यू किंवा मलेरिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी महापालिकेकडून डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून औषध फवारणी करण्यात येते.(औरंगाबाद येथे 26 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने आकडा 1212 वर पोहचला)

दरम्यान, राज्यात कोरोनाची परिस्थिती असताना डेंग्यू आणि मलेरिया डासांच्या अळ्या सापडणे थोडे घाबरण्यासारखेच आहे. परंतु नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्याचसोबत राज्यात कोरोनाचा वेग जरी संथ झाला असला तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. येत्या 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.