BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

मुंबईची ऐतिहासिक ओळख दाखवून देणाऱ्या डबल डेकर बसेस आता भंगारात देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भंगारात देण्यात येणाऱ्या डबल डेकर्सला 15 वर्ष पूर्ण झाली असून 2005 मध्ये तयार करण्यात आल्या होत्या. परंतु नागरिक, ट्रेड युनियनचे मेंबर्स आणि एक्सपर्ट्स यांनी असे म्हटले आहे की, बस चांगल्या स्थितीत असल्यास तर त्या अशा परिस्थितीत पुढे वापरण्यास योग्य ठरतील. यापूर्वीच्या रिपोर्टमध्ये असे म्हणणात आले होते की, बेस्टकडून जवळजवळ 900 बेस्ट भंगारात देण्यात येणार असून त्यापैकी 60 डबल डेकर बसेस शहरात आहेत.

बेस्ट अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, 2005-06 वर्षातील काही बसेस असून त्यांना 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता त्या नागरिकांच्या सुविधेसाठी वापरल्या जाऊ नयेत. या डबल डेकर भंगारात दिल्यानंतर यांची जागा मिनी बसेस घेतील परंतु त्यांची किती संख्या असेल याबबद्दल अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. अधिकाऱ्यांच्या मते, बेस्ट जुन्या डबल डेकर भंगारात देऊन नव्या घेणार असल्याचा प्रस्ताव आहे. परंतु यावर अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे.(वेब मीडिया असोसिएशन मुंबई ची 28 ऑगस्ट दिवशी ऑनलाईन बैठक)

बेस्टने 898 पैकी 354 बस या भंगारात दिल्या असून त्या रस्त्यांवर या वर्षात दिसून येणार नाहीत. उर्वरित 544 बस या टप्प्याटप्प्यानुसार भंगारात दिल्या जाणार आहेत. एका वरिष्ठ बेस्ट अधिकाऱ्याने मिरर ऑनलाईन यांना असे सांगितले की, बेस्ट बसचे आयुष्य हे 15 वर्ष असते. त्यानंतर त्या भंगारात द्याव्यात असे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले आहेत. तर एप्रिल 2020 ते मार्च 2021 या दरम्यान एकूण 898 बस भंगारात दिल्या जातील. यामध्ये डबल डेकरचा सुद्धा समावेश असणार आहे. या संदर्भातील एकत्रितपणे एक प्रस्ताव जनरल मॅनेजर यांना दिला असून त्यात बहुतांश बस या भंगारात द्यायच्या की त्यांचे नव्याने रुपांतर करायचे असे ही त्यात म्हटले आहे.(Vehicle Tax Exemption: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वाहन करमाफी)

डबल डेकर बस या बेटांवरील शहरात 1937 मध्ये लॉन्च करण्यात आल्या होत्या. या बसची 1947 मध्ये उंची 247 फूट होती. मात्र काही वर्षानंतर या बसची उंची कमी करत ती फक्त 120 फूट करण्यात आली. परंतु डबल डेकरची उंची कमी केल्यानंतर काही जणांनी यावर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. यावर बेस्टने अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले होते की, डबल डेकरमध्ये दोन कंन्टक्टर ठेवल्यास अधिच नुकसान होईल. त्यामुळे सामान्य बसला सुद्धा याचा फटका बसू शकतो. ऐवढेच नाही तर डबल डेकर बस या सर्वच मार्गांवर धावतील असे नाही.

सध्या डबल डेकर मुंबईतील 16 मार्गांवर धावतात. त्यात कुर्ला-बीकेसी-वांद्रे, कुर्ला-सांताक्रुझ, सीएसएमटी ते नरिमन पॉइंट/कफ परेड, कुलाबा ते वरळी आणि अंधेरी ते सिप्झ या मार्गांचा यामध्ये समावेश आहे.