
वेब मीडिया असोसिएशन,मुंबई यांची झूम (ZOOM) अप्लिकेशन द्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक 28 ऑगस्ट दिवशी दुपारी 2 वाजता होईल. वेब मीडिया असोसिएशन मुंबई या संस्थेचे अध्यक्ष व गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे चेअरमन अनिल महाजन, उपाध्यक्ष इरफान शेख व संचालक सदस्य अभिजित पाटील, आनंद शर्मा, अयाज मोहसिन, नरेंद्र कसबे, माऊली डांगे, प्रमोद दांडगव्हाण, गणेश पुजारी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन केले आहे. राज्यातील व केंद्रीय पातळीवरील ज्या वेब न्यूज पोर्टल धारकांना या वेब मीडिया असोसिएशन मध्ये काम करायचे असेल किंवा सदस्य व्हायचे असेल यांनी या बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहावे व खालील दिलेल्या नाव नंबर वर संपर्क करावे.
ऑनलाईन बैठकीचे विषय
- आधुनिक तंत्रज्ञान मध्ये नवीन प्रवाह आला आहे तो म्हणजे वेब मीडिया जलद गतीने इंटरनेट ह्या मदतीने न्यूज प्रसारित केली जात आहे. यासाठी वेब मीडियासाठी केंद्र सरकारने पॉलिसी तयार करावी या साठी प्रस्ताव तयार करून माहिती प्रसारण मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांचे कडे पाठवणे.
- वेब मीडिया असोसिएशनची सदस्य नोंदणी व नवीन कार्यकारणी करणे.
- केंद्र सरकारने वेब मीडियाची पॉलिसी ठरवावी यासाठी केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठवणे बाबत व शासन दरबारी पाठवुरावा करणे साठी ०५ लोकांची समिती नेमणे.
- आयता वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे.
वेब मीडिया असोसिएशन, मुंबई. झूम (ZOOM) अप्लिकेशन द्वारे ऑनलाईन बैठक दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.