केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहराची हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरामध्ये दाट धुके पसरले आहे. ज्यामुळे शहरात आज सकाळी अनेक ठिकाणी वातावरण धुसर झाले होते. हवेची गुणवत्ता खालावण्यापूर्वीच काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही सीपीसीबीने सूचवले आहे. राजधानी दिल्ली पाठिमागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण आणि धुके यांमुळे खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला त्यापासून रोखायचे असेल तर वेळीच काही पावले उचलने आवश्यक बनले आहे.
मुंबईसाठी कोस्टल एअरशेडची अभ्यासात शिफारस
एमडीपीआय (MDPI) च्या एअर जर्नलमध्ये 'डेझिग्नेटिंग एअरशेड्स इन इंडिया फॉर अर्बन अँड रिजनल एअर क्वालिटी मॅनेजमेंट' या शीर्षकाखाली नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात मुंबईला उपनगरांचा समावेश असलेल्या, किनारपट्टीच्या एअरशेडमध्ये समाकलित करण्याचा प्रस्ताव आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रादेशिक सहकार्याद्वारे शहरी आणि बिगर-शहरी उत्सर्जन स्त्रोतांकडे लक्ष देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ज्यामुळे मुंबई वायुप्रदूषण काही प्रमाणात तरी नियंत्रित होऊ शकेल.
अर्बन इमिशन्स डॉट इन्फोचे संस्थापक आणि प्रमुख लेखक शरथ गुट्टीकुंडा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "प्रादेशिक वायू प्रदूषणात मुंबईचे लक्षणीय योगदान आहे. स्थानिक उत्सर्जनाचे व्यवस्थापन केल्याने शहराला फायदा होतो, तर आसपासच्या उपग्रह शहरांनाही सहयोगात्मक प्रयत्नांचा फायदा होतो. समन्वित व्यवस्थापन एक सकारात्मक अभिप्राय चक्र तयार करू शकते, ज्यामुळे संपूर्ण पाश्चिमात्य एअरशेडमध्ये हवेची गुणवत्ता आणि आरोग्याचे परिणाम वाढतील. (हेही वाचा, Cyclone Fengal Nears Tamil Nadu: तामिळनाडूच्या समुद्रात 'फेंगल' चक्रीवादळ; आयएमडीनेकडून सावधानतेचा इशारा, समुद्र किनारपट्टी भागातील शाळा बंद)
भारताची प्रादेशिक एअरशेड योजना
या अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, भारताला वेगवेगळ्या हवामान आणि प्रदूषणाच्या नमुन्यांनुसार 15 प्रादेशिक एअरशेड्समध्ये विभागले गेले आहे. यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे:
- हिमालय (2 Airsheds)
- गंगेची मैदाने (4 Airsheds)
- पठार (4 Airsheds)
- शुष्क/वाळवंट (1 Airshed)
- किनारपट्टीवरील मैदाने (3 Airsheds, including Mumbai)
- बेटे (1 Airshed)
अभ्यास सूचवतो की, वायू प्रदूषण प्रशासकीय सीमांच्या पलीकडे जाते आणि त्यासाठी शहरे, राज्ये आणि प्रदेशांमध्ये सामूहिक कारवाईची आवश्यकता असते.
BKC परिसरात धुके आणि वायुप्रदूषणाची स्थिती सांगणारा व्हिडिओ
#WATCH | Maharashtra | A blanket of smog covered several parts of Mumbai city as the air quality in various areas is in the 'Moderate' category, as per the Central Pollution Control Board.
(Visuals from around Bandra Kurla Complex area) pic.twitter.com/fliBPDlSIp
— ANI (@ANI) November 28, 2024
मुंबईच्या हवेची गुणवत्ता, हिवाळ्यातील हवामान परिस्थिती आणि शहराच्या हद्दीतून आणि बाहेरून येणाऱ्या प्रदूषणाच्या स्त्रोतांमुळे लक्षणीयरीत्या खालावते. जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 मध्ये 2022 च्या याच कालावधीच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये PM 2.5 च्या पातळीत 23% वाढ झाली आहे, ज्यामुळे मुंबईला हिवाळ्यात जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित शहरांमध्ये स्थान मिळाले आहे.
जमिनीवरील समुद्राच्या वाऱ्यांचे फायदे असूनही, मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढत आहे. प्रस्तावित किनारी एअरशेड धोरणामुळे शहरी स्थानिक संस्था, राज्य अधिकारी, मंत्रालये आणि भागधारकांमध्ये हवेच्या गुणवत्तेच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य सुलभ होऊ शकते, असे अभ्यासक सांगतात.