भारतामध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) बाबतीत महाराष्ट्र हे सर्वाधित प्रभावित राज्य आहे. या विषाणूशी लढा देण्यासाठी सरकार शर्थीने लढत आहे. अशात राज्यात अजून एक नवी समस्या उद्भवली आहे. महाराष्ट्रात म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य संसार्गामुळे कमीतकमी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आठही असे लोक होते ज्यांनी कोविड-19 वर विजय मिळवला होता. मात्र कोरोनामधून बरे झाल्यावर काळ्या बुरशीचा त्यांना फटका बसला. राज्यात म्यूकोरमायकोसिसने ग्रस्त अशा सुमारे 200 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबत माहिती दिली.
तात्याराव लहाने म्हणाले की, म्यूकोरमायकोसिसचे प्रकार वाढत आहेत. त्यांनी पीटीआयला सांगितले की, ‘राज्याच्या विविध भागात आतापर्यंत 200 रुग्णांपैकी 8 जण म्यूकोरमायकोसिसमुळे मरण पावले आहेत. हे लोक कोरोना विषाणूमधून बाहेर पडले होते, परंतु बुरशीजन्य संसर्गाने त्यांच्या आधीच कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला केला व रुग्णांसाठी ही गोष्ट प्राणघातक ठरली.’ नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांनी शुक्रवारी सांगितले की, म्यूकोरमायकोसिस रोग हा म्यूकोर नावाच्या बुरशीमुळे होतो जो ओलसर पृष्ठभागांवर आढळतो.
ते असेही म्हणाले की, जेव्हा कोविड-19 च्या रुग्णाला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले जाते तेव्हा वायुला आर्द्रता मिळावी यासाठी त्यामध्ये एक जलयुक्त उपकरण ठेवले जाते. अशा परिस्थितीत बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. डॉक्टर लहाने म्हणाले की, या बुरशीजन्य संसर्गाबद्दल आधीच माहिती होती, परंतु कोविड-19 संबंधित गुंतागुंतीमुळे त्याची प्रकरणे वाढत आहेत. कधी कधी स्टिरॉइड औषधांच्या वापरामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि काही औषधांमुळेही प्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशावेळी इतर संसर्गजन्य आजार शरीरावर हल्ला करतात. (हेही वाचा: Lockdown: महाराष्ट्रात 15 मे नंतर लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचा? राजेश टोपे यांनी केले स्पष्ट)
दरम्यान, कोविड-19 नंतर फंगल इन्फेक्शन म्यूकोरमायकोसिसमुळे डोळ्यांची दृष्टी कमी झाल्याच्या घटना गुजरातमध्ये वाढल्या आहेत. अशा रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे,