Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनदेखील नोकरी न मिळाल्याने एका तरूणाने आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर (वय, 24) (Swapnil Lonkar) असे त्या तरूणाचे नाव असून तो पुण्यातील (Pune) फुरसुंगी परिसरात वास्तव्यास होता. या घटनेमुळे फक्त पुणे नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या घटनेवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रींमंडळाच्या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीवरही चर्चा होणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.

स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारला घेरले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण देरेकर, आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राज सरकर तोफ डागली आहे. हे देखील वाचा-Jalgaon Suicide: लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी देखील एमपीएससीबाबत ट्वीट केले आहे. “कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरीत घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात”, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे