Monsoon entry in Mumbai | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Weather Forecast: नैऋत्य मान्सून (Monsoon) मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्रच्या भागातून पुढे सरकल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) कालच (Mumbai Weather Forecast) दिली होती. दरम्यान, स्थानिक हवामान विभागाने मान्सून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज अधिकृतपणे दाखल (Monsoon entry in Mumbai) झाला असल्याची घोषणा केली आहे. मान्सून दाखल होताच मुंबईमध्ये दमदार पावसाने हजेरी (Mumbai Rains) लावली. मुंबई शहर, उपनगर यांशिवाय ठाणे, रायगड, पालघर अशा मुंबईलगतच्या जिल्ह्यांमध्येही दमदार पाऊस (Mumbai Rains Updates) बरसला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आयएमडीने राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळा इशारा दिला आहे. केरळमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. 2023 मध्ये, संपूर्ण भारतात पावसाळ्यात (जून-सप्टेंबर) पाऊस त्याच्या दीर्घ-काळाच्या सरासरीच्या 94 टक्के होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) असून पुढील तीन ते चार तासांत मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असे म्हटले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट लागू आहे. मुंबईतील प्रादेशिक IMD कार्यालयाने इशारा दिला आहे की, या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. "विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत काही ठिकाणी विजयाची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या", असेही आयएमडीने नागरिकांना उद्देशून म्हटले आहे. (हेही वाचा, IMD Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी)

मुंबईमध्ये दमदार पाऊस, सकल भागात साचले पाणी

दरम्यान, मुंबई आणि ठाण्यातील काही भागांत पावसाने रविवारी (9 जून) जोरदार हजेरी लावली, शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पाणी साचले होते. याव्यतिरिक्त, IMD ने म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशात पुढे सरकला आहे. "नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागात आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात शनिवारी (8 जून 2024) पुढे सरकला आहे. (हेही वाचा- उद्या कोकण, दक्षिण मध्य-उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या वीजा चमकत असताना कशी घ्यावी दक्षता)

एक्स पोस्ट

नैऋत्य मोसमी पावसाचे मध्य अरबी समुद्राच्या अतिरिक्त प्रदेशात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती अपेक्षित आहे, ज्याचा पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणावर परिणाम होईल.