Cloudy Weather | (File Image)

Maharashtra Weather Forecast: मुंबई शहरात पाठिमागील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस म्हणावा अशी पर्जन्यवृष्टी (Mumbai Monsoon 2024) झाली आहे. उर्वरीत महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने हवामान अंदाज (IMD Mumbai Weather Forecast) व्यक्त करताना राज्याती विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आयएमडीने सिंधुदुर्गला रेड अलर्ट, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडला यलो अलर्ट दिला आहे. हवामान अंदाजानुसार राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटांसह पर्जन्यवृष्टी होईल.

नागरिकांना हवामानाचा इशारा

आयएमडीने विविध भागांमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. विशेषत: मुंबई, ठाणे आणि रायगडला रविवारी पहाटे 4:00 वाजल्यापासून 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची अपेक्षा आहे. रहिवाशांना घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा- उद्या कोकण, दक्षिण मध्य-उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या वीजा चमकत असताना कशी घ्यावी दक्षता)

आयएमडीने शनिवारी नोंदवले की नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशात पुढे सरकला आहे. पुढील 2-3 दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील अधिक भाग (मुंबईसह) आणि तेलंगणामध्ये मान्सूनची प्रगती होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबई शहरात मुसळधार पावसाची सुरुवात, हवामान विभागाकडून यलो अलर्ट)

देशभरामध्ये मान्सून सक्रीय

दरम्यान, नुकत्याच आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे बुधवारी देशभरातील विविध भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. गुवाहाटीमध्ये पाणी साचले, हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मनालीमध्ये पाऊस झाला आणि चेन्नईला जोरदार सरी कोसळल्या. याशिवाय कर्नाटकातील हुबळी येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान, पुढील २-३ दिवसांत मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्राचा काही भाग (मुंबईसह) आणि तेलंगणामध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला, भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रासाठी विविध हवामान अलर्ट जारी केले आहेत, ज्यात सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.