महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जानेवारी महिन्यात राज्यव्यापी महाअधिवेश आयोजि केले होते. या अधिवेशनाला अनेक बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिवेशनात त्यांनी पक्षाच्या झेंड्यात बदल केला. त्यावेळी अमित ठाकरेंची नेतेपदी निवड करून त्याचं राजकारणामध्ये लॉन्चिंग करण्यात आलं आहे. मनसे महाअधिवेशनामध्ये व्यासपीठावर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण विषयाशी संबंधित ठराव मांडला होता. अधिवेशनात मनसेच्या शॅडो कॅबिनेटची नावे घोषित होतील अशी चर्चा होती. मात्र आता 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन आहे. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून शॅडो कॅबिनेटची घोषणा केली जाईल याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर राज ठाकरे यांच्या मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये ठराविक नेत्यांना संधी मिळते. याच पार्श्वभुमीवर संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आणि अभिजित पानसे यांची नावे चर्चेत असून त्यांना मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश असू शकतो. परंतु, कोणत्या नेत्याकडे कोण्त्या मंत्र्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर शॅडो कॅबिनेट म्हणजे सत्तेत नसलेला पक्ष आपल्या नेत्यांचा एक गट तयार करून त्यांना विशेष अधिकार दिले जातात. या गटाला सरकारमधील मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांवर व त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे अधिकार दिले जातात. अशा या गटाला शॅडो कॅबिनेट म्हटले जाते.(6 मार्चच्या महाराष्ट्र अर्थसंकल्पासाठी 'मनसे'ने दिल्या महत्वाच्या सूचना; MNS शिष्टमंडळाने घेतली अर्थमंत्री अजित पवार यांची भेट)
तसेच राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात बदल केल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांनी आक्षेप घेतला होता. राज ठाकरे यांनी समतेचा भगवा झेंडा घेतला असेल तर आम्ही नक्कीच त्याचे स्वागत करु. आम्ही भारतीय संविधान आणि लोकशाहीला मानणारे व्यक्ती आहोत. परंतु झेंड्यावर ‘राजमुद्रा’ वापरणे हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड अजिबात सहन करणार नाही. भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांनीही शांतीचे प्रतीक म्हणून भगवा झेंडा स्विकारला होता. हेच मनसेनेही स्विकारावं, त्यांनी हिंदुत्वाची झालंर पांघरु नये”, असं संभाजी ब्रिगेडने म्हटले होते