सर्वसामान्यांसाठी पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chichwad) मध्ये घरं घेण्यासाठी आता खूषखबर आहे. आज (5 जानेवारी) पासून 5915 घरांसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या सदनिकांची सोडत 17 फेब्रुवारी दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर होणार आहे. आज दुपारी 12 वाजता मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
म्हाडाकडून ऑक्टोबर महिन्यात मुंबई,पुणे,कोकण विभागामध्ये सोडत जाहीर करण्याचा प्लॅन होता पण त्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम आल्याने सोडत रद्द झाली होती. आता पुन्हा सोडतीच्या नोंदणीला सुरूवात झाली आहे. MHADA Latest News: म्हाडा नोंदणीसाठी नवी संगणकीय प्रणाली, एकदाच नोंदणी करून कोणत्याही मंडळासाठी करता येणार अर्ज .
म्हाडा सोडतीचं वेळापत्रक
अर्जप्रक्रिया आणि नोंदणी - 5 जानेवारी ते 4 फेब्रुवारी
ऑनलाईन पेमेंट- 6 जानेवारी ते 6 फ़ेब्रुवारी
अर्जपात्रांची यादी - 15 फेब्रुवारी
सोडत- 17 फेब्रुवारी
पहा ट्वीट
#म्हाडा ने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी #पुणे आणि #पिंपरीचिंचवड शहरांतील 5915 सदनिकांची सोडत जाहीर केली. त्यानुसार नागरिकांना आजपासून 4 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करता येणार. घरांची सोडत 17 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे, pic.twitter.com/u7vyaPqTnw
— AIR News Pune (@airnews_pune) January 5, 2023
म्हाडाच्या घराच्या सोडतीचा आणि ताबा मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. त्यात म्हाडाचा हस्तक्षेप नसेल. घरांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत असणार आहे. त्यामुळे ती पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ ठेवली जाणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे. इथे पहा प्रोजेक्ट्स,
आता अर्ज करण्यासाठी देखील केवळ 6 कागदपत्रांची गरज असणार आहे. तसेच कागदपत्रांची छाननी अर्जप्रक्रियेच्याच वेळी होत असल्याने भाग्यवान विजेत्यांना त्यांची देकार पत्र मिळाल्यानंतर घरांचा ताबा घेण्याची प्रक्रिया देखील सुकर होणार आहे.