Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडासाठी एकदाच नोंदणी (MHADA Registration) करुन त्याच नोंदणीवर आता इतर कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरुपी नोंदणी (MHADA Latest News) सुरु होत आहे. येत्या 5 जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, म्हाडा (MHADA) सोडत प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. नव्या प्रक्रियेनुसार आता संगणकीय प्रणालीद्वारे सोडत केली जाणार आहे. त्यामुळे सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या पद्धतीमुळे आता म्हाडाकडे अर्ज करतानाच आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे. सोडतीपूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी केली जाईल. ही छाननी झाल्यावरच पात्रता निश्चिती केली जाणार आहे. जे अर्जदार छाननीत पात्र ठरतील तेच सोडत प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे घडामोडी वेगवान घडणार असून, सोडतीदरम्यान जे विजयी होतील त्यांना घरांचा ताबा तत्काळ मिळणार आहे.

म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळांसाठी वेगवेगळी नोंदणी करावी लागत होती. आता नव्या प्रक्रियेमुळे च एकच कायमस्वरुपी नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीद्वारे इतर कोणत्याही मंडळाकडे नोंदणी करता येणार आहे. ज्या व्यक्तीला या सोडतीसाठी अर्ज करायचा आहे, तो व्यक्ती सोडत जाहीर झाल्यानंतर या नोंदणीद्वारे लगेचच अर्ज करु शकतो. येत्या गुरुवार म्हणजेच 5 जानेवारीपासून या नोंदणीला सुरुवात होणार असल्याचे वृत्त लोकसत्ता डॉट कॉमने म्हाडातील वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. (हेही वाचा, BMC Civic Schools: नागरी शाळांसाठी मुंबई महापालिकेला मिळणार 65 नव्या इमारती)

नोंदणीबद्दल थोडक्यात

गुरुवार दिनांच 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजलेपासून नोंगणीस सुरुवात होईल. नोंदणी प्रक्रियेतील नव्या बदलामुळे आता नोंदणी करतावेळीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तताक करून ती सादर करावी लागणार आहेत. जसे की, पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला वगैरे. एखादा व्यक्ती जर सामाजिक आणि इतर आरक्षित गटांतील असेल तर त्याला त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.