Mhada Lottery Registration: मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रोपॉलीटन शहरे आणि राज्यातील विविध भागांमध्ये नागरिकांना किफायतशीर दरात घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असते. त्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) विशेष सक्रीय असते. राज्यातील नागरिकही या प्राधिकरणाच्या विविध उपकरणांना प्रतिसाद देते. म्हणूनच म्हाडा लॉटरी (MHADA Lottery Required Documents) केव्हा निघते याबाबत अनेकंना उत्सुकता असते. पण केवळ उत्सुकता असून चालत नाही. म्हाडाचे घर मिळावे यासाठी नोंदणी (Mhada House Documents) करायची असेल तर त्यासाटी आवश्यक कागदपत्रे आणि काही बाबींची पूर्तताही करावी लागते. ही कागदपत्रे आणि आवश्यक बाबी कोणत्या? घ्या जाणून.
म्हाडा लॉटरी आणि नोंदणी प्रक्रिया
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण द्वारा उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या किफायतशीर दरातील घरांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी नोंदणी आवश्यक असते. नोंदणी सुरू करण्यापूर्वी खालील आवश्यक कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करून घ्यावी लागते. ज्यामुळे नोंदणी करताना समस्या निर्माण होत नाहीत आणि नोंदणी अर्ज फेटाळला जात नाही. (हेही वाचा, MHADA Konkan Board Housing Lottery 2024: म्हाडा च्या कोकण विभागीय बोर्डाकडून 12,626 घरांसाठी लॉटरी जाहीर, housing.mhada.gov.in वर करा अर्ज)
नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी
म्हाडा लॉटरी मध्ये घर मिळावे म्हणून नोंदणी करण्यापूर्वी खालील आवश्यक कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करून घ्यावी.
नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी:
मोबाईल क्रमांक:
नोंदणीकृत मोबाईल हा सदर अर्जदाराच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असायला हवा. जेणेकरून अर्जदाराला आधार पडताळणीकरिताचा OTP मोबाईल क्रमांकावर प्राप्त करता येईल.
ईमेल आयडी (सक्रीय असलेला)
अर्जदार ग्राहकाने मोबाईल क्रमांकासोबतच आपला ईमेल आयडी सामायिक करणे क्रमप्राप्त आहे. कारण, ईमेल आयडीची सत्यता पडताळणीकरिताचा OTP आपल्या ईमेल आयडीवर पाठवला जातो. तसेच, लॉटरी संदर्भातील इतर संदेश या ईमेल आयडीवरती पाठवले जातात. त्यामुळे सदर व्यक्तीचा ईमेल आयडी सक्रीय असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड:
अर्जदाराचा आधार क्रमांक व्यवस्थीत असावा. त्यासोबत दिलेला तपशील आपल्या कागदपत्रांशी मिळताजुळता असावा. कारण आपल्या आधारक्रमांकाच्या यशस्वी पडताळणीअंती, आपल्या आधारकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होते.
पॅन क्रमांक:
अर्जदाराच्या आधार क्रमांकाची पडताळणी यशस्वी होताच त्याच्या पॅनकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होते. त्यामुळे अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वीच आपले पॅन कार्ड डिजीलॉकर प्रणालीशी जोडले (link) असल्याची खात्री करून घ्यावी.
पती/पत्नीचे आधार कार्ड
अर्जदार जर विवाहीत असेल तर दोघांचे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. कारण, आपल्या आधारक्रमांकाची यशस्वी पडताळणीअंती, आपल्या आधारकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होते.
पती/पत्नीचे पॅन कार्ड
अर्जदार विवाहीत असल्यास त्याने जोडीदाराचे पॅन कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आधारक्रमांकाची यशस्वी पडताळणीअंती, आपल्या पॅनकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल. आपले पॅन कार्ड डिजीलॉकर प्रणालीशी जोडले (link) असल्याची खात्री करून घ्यावी.
महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त अधिवास प्रमाणपत्र
अर्जदाराकडे महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे 1 जानेवारी 2018 नंतर जारी झालेले ग्राह्य धरण्यात येईल व ते महाऑनलाइन प्रणालीद्वारे जारी केलेले व बारकोड असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.डोमिसाईल टोकन नंबर स्वीकारला जाणार नाही. नवीन अधिवासासाठी अर्ज करण्यासाठी, या लिंकवर क्लिक करा.
अर्जदाराचा उत्पन्नाचा पुरावा
अर्जदाराकडे निकषानुसार आवश्यक उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे आयकर परतावा असल्यास त्याबाबतची माहिती द्यावी. त्यासाठी खालील बाबींचे पालन करावे.
अर्जदाराची पती/पत्नी नोकरी/व्यवसाय करीत असल्यास त्यांचा उत्पन्न पुरावा
जर आपल्याकडे आयकर परतावा असल्यास: पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती/पत्नी नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न नोंदवावे. यानंतर आपला इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड टाकून “verify” बटन क्लिक करावे. संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेल्या वर्षाकरिताचे आपले उत्पन्न पडताळेल.
तहसिलदार उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास (अर्जदार किंवा त्यांची पती/पत्नी यापैकी कोणाही एकाचे)
तहसीलदार कार्यालयाने दिलेले कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र (ज्यात अर्जदार स्वतःचे व त्याच्या पती/पत्नीचे उत्पन्न समाविष्ट असेल) ग्राह्य धरले जाईल. पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती/पत्नी नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न नोंदवावे. संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेल्या वर्षाकरिताचे आपले उत्पन्न पडताळेल.
नव्या वर्षात (2025) अनेक ठिकाणी लॉटरी
म्हाडाच्या सदनिका विक्री सोडतीमध्ये सहभागी व्हा, नववर्षात गृहस्वप्नपूर्तीचा आनंद साजरा करा! नोंदणी व अर्ज करण्याकरिता https://t.co/qcLWXn8xsi या अधिकृत संकेतस्थळाला आजच भेट द्या.
आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Begin the New Year by taking a step… pic.twitter.com/1g7cRk3zVW
— MHADA (@mhadaofficial) January 1, 2025
जात प्रवर्गातील आरक्षण
विशेष आरक्षित प्रवर्ग
जर आपणाला विशेष आरक्षित प्रवर्गातून (कलाकार,पत्रकार, राज्य शासन कर्मचारी, केंद्र शासन कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्या वरील अवलंबीत व्यक्ती, म्हाडा कर्मचारी, दिव्यांग, आमदार व खासदार) अर्ज करवायचा असल्यास योग्य त्या प्रवर्गासमोरील ‘हो’ पर्याय निवडावा अर्ज करवायचा असल्यास लागणाऱ्या बाबी:
- म्हाडा कर्मचारी व दिव्यांग प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गाकरिता अर्जदाराला “certificate Generation” पर्याय वापरुन नवीन प्रमाणपत्र तयार करावे लागेल. व ही तयार केलेले प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकीत करून अपलोड करावे लागेल.
- म्हाडा कर्मचारी यांना आपले कर्मचारी क्रमांक असलेले ओळखपत्र अपलोड करावे लागेल.
- दिव्यांग प्रवर्गाकरिता अर्जदाराला UDID / स्वावलंबन कार्ड अपलोड करावे.
- कलाकार प्रवर्गाची पडताळणी ही अर्जदाराने घराचा ताबा मिळण्यापूर्वी कलाकार प्रवर्गाचे प्रमाणपत्र जमा करावे या अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
- स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गाची पडताळणी ही अर्जदाराने घराचा ताबा मिळण्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गाचे प्रमाणपत्र जमा करावे या अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
- जर तुम्ही खासदार / आमदार या प्रवर्गातील असाल आणि आपल्याकडे त्याचे प्रमाणपत्र नसेल तर खासदार/आमदार प्रवर्गाची पडताळणी ही अर्जदाराने घराचा ताबा मिळण्यापूर्वी खासदार/आमदार या प्रवर्गाचे प्रमाणपत्र जमा करावे या अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
दरम्यान, म्हाडा पोर्टलवर दिलेल्या विशेष सूचनेनुसार, विशेष आरक्षित प्रवर्गातील अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकीत नसेल व जरी असे प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीने स्विकारले तरी अशा अर्जदारांचे अर्ज कोणत्याही वेळी रद्द होण्यास पात्र असतील. त्यामुळे म्हडाडचे घर घरेदी करण्यापूर्वी प्राधिकरणाने सूचवलेल्या अधिकृत बाबींची पुर्तता होणे महत्त्वाचे आहे.