अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे निधन, आम आदमी पक्षाकडून शोककळा व्यक्त
मीरा सन्याल (फोटो सौजन्य- फेसबुक)

मुंबई,जानेवारी 12 : अर्थतज्ञ आणि भारतातील स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल (Meera Sanyal) यांचे गुरुवारी निधन झाले आहे. मीरा सन्याल या 57 वयाच्या असून त्यांना कर्करोगाचा आजार होता. तर आम आदमी पक्षाकडून मीरा सन्याल यांच्या निधनाने शोककळा व्यक्त केली जात आहे.

मीरा सन्याल यांनी 2014 रोजी आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला होता.त्यासाठी सन्याल यांनी बँकींग क्षेत्रातील करिअर सोडले होते. तसेच 2009 मध्येही सन्याल यांनी दक्षिण मुंबईतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना निवडणुकीमध्ये पराभव स्विकारला होता.

2018 मध्ये नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीशी संबंधित The Big Reverse नावाचे पुस्तक मीरा सन्याल यांनी प्रकाशित केले होते. मात्र सन्याल यांच्या दु:खद निधनामुळे दिल्ली मुख्यमंत्री अरविंद (Arvind Kejriwal) केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्वीटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.