मराठी माणसाची आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी; डॉ. अतीश दाभोलकर यांची ICTP संचालकपदी निवड
Indian Scientist Atish Dabholkar | (Photo Credits: Facebook)

मूळचे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील असलेले भारतीय विज्ञान अकादमीचे सदस्य डॉ. अतीश दाभोलकर (Atish Dabholkar) यांची आयसीटीपी (ICTP ) संचालक पदावर निवड झाली आहे. आयसीपीटी (ICTP) म्हणजेच 'आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्र' ही इटलीस्थित संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर सैद्धांतिक भौतिकी संशोधनात महत्त्वपूर्ण कार्य करते. अत्यंत ग्रामीण आणि तळागाळातून आलेल्या व्यक्तीला इतक्या मोठ्या संस्थेत अधिकार पदावर काम करण्याची संधी मिळणे ही बाब मराठी माणसासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे.

आयसीटीपी कार्य आणि महत्त्व

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सैद्धांतिक भौतिकी संशोधनात महत्त्वपूर्ण सहभाग
  • मूलभूत संशोधन आणि जगभरात वैज्ञानिक क्षमता विकसित करण्यात ICPT ची मोठी भूमिका
  • ‘आयसीटीपी’ ही ‘युनेस्को’ची प्रथम श्रेणीची संस्था
  • इटली सरकार, आंतरराष्ट्रीय परमाणू ऊर्जा संस्था, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि
  • सांस्कृतिक संघटना (युनेस्को) यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार ICPT कार्यरत .
  • अनेक देशांच्या वैज्ञानिक धोरण, त्याची दिशा आणि प्रशासकीय निर्णयांत ‘आयसीटीपी’ महत्त्वाची भूमिका निभावते.

डॉ. अतीश दाभोलकर अल्पपरिचय

मूळचे कोल्हापूरचे असलेल्या डॉ. अतीश दाभोलकर यांचा जन्म 1993 मध्ये झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी येथे शालेलय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर’ येथून आयआयटी पदवी प्राप्त केली. पुढे प्रिस्टन विद्यापीठातून सैद्धांतिक भौतिकशास्त्र विषयात डॉक्‍टरेट मिळवली. डॉक्टरेच मिळवल्यानंतरही डॉ. दाभोलकर यांची संशोधनवृत्ती कायम राहिली. त्यांनी रटगर्स विद्यापीठ, हावर्ड विद्यापीठ आणि कॅलटेक येथे अनेक महत्त्वाच्या विषयावर संशोधन केले. (हेही अहमदनगरच्या शुभांगी भंडारे हिची इंग्लंड भरारी, फुटबॉल मध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

डॉ. अतीश दाभोलकर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी

दरम्यान, 1966 मध्ये भारतात परतलेल्या डॉ. अतीश दाभोलकर यांनी मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अध्यापनाचे कार्य केले. फ्रान्स देशातील सोरोबोन विद्यापीठ आणि ‘नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च’संस्थेत त्यांनी संशोधन संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. डॉ. अतीश दाभोलकर यांचे ‘स्ट्रिंग सिद्धांत’ आणि ‘क्वांटम कृष्णविवरां’वरील संशोधन जगप्रसिद्ध आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यात शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (2007), ‘आयआयएम नॅशनल लीडरशिप ॲवॉर्ड’ (राष्ट्रपतींच्या हस्ते) यांचा समावेश आहे.