थंडीचा कडाका राज्यात काहीसा अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा (Temperature) पारा घसरला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी काही शेती (Agriculture) आणि पिकांसाठी वातावरण (Maharashtra Weather Report) पुरक तर काही पिकांसाठी मारक ठरते आहे. लहान मुले आणि वृद्धांमध्येही सर्दी, खोकला, थंडी वाजणे असा प्रकार सुरु झाला आहे. त्यामुळे या वर्षातील शेवट्या महिन्यातील म्हणजेच डिसेंबरचा पहिला आठवडा काहीसा बदलत्या वातावरणाचा पाहायला मिळतो आहे.
मुंबई, कोकणात वातावर ढगाळ पाहायला मिळत आहे. त्यातच थंडीही जाणवत आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही हवामान तज्ज्ञ वर्तवत आहेत.
दरम्यान, सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये थंडी ऐवजी सरासरी तापमान वाढल्याचे पाहायला मिळते आहे. तापमानात सरासरी 2 ते 4 सेल्सीअस अंशााच फर पडला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये विशेष थंडी जाणवत नाही. मात्र, पुढच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा अधिक वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Winter Update: थंडी पसरली, शेकोट्या पेटल्या; महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हुडहुडी, ग्रामीण भागात धुके; राज्यात तापमान घटले)
उत्तर महाराष्ट्राबाबत बोलायचे तर नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक जिल्ह्यात थंडी काहीशी अधिक जाणवू शकते. पारा घसरल्याने आतापासून हुडहुडी भरल्याचे पाहायला मळत आहे.
उत्तर महाराष्ट्रासोबत महाठवाड्यातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटलेल्या जात आहेत.
दरम्यान, थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. काही नागरिक आणि लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला काही प्रमाणामध्ये ताप अशा किरकोश समस्या वाढल्या आहेत. जुने दुखणे असलेल्या नागरिकांना अंगदुखीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नये असा सल्ला डॉक्टर आणि वैद्यकीय विभागाचे अभ्यास देतात.