Supriya Sule (Photo Credits-Twitter)

सध्या राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. आज पत्रकरांशी संवाद साधतान त्या म्हणाल्या, ‘मी उद्धवजींचे ट्विट पाहिले. माझ्या या कुटुंबाशी (ठाकरे) भावना जोडल्या आहेत. सरकारे येतील आणि जातील, पण हे संबंध दीर्घकाळ टिकतील. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताचा 144 आकडा नाही. त्यांच्याकडे फक्त 50 आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे असे म्हणता येणार नाही.

पुढे त्या म्हणाल्या, ‘सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला ईडीच्या नोटिसा येत आहेत. अशा गोष्टी देश आणि संविधानासाठी चांगल्या नाहीत (आज शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले). जे राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतात (एकनाथ शिंदे गटातील) ते एकेकाळी राष्ट्रवादीत होते. दीपक भाऊ राष्ट्रवादीत होते, तर उदय सामंत पक्षाच्या युवा शाखेत होते. मला वाईट वाटते की त्यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा आम्ही त्यांना वाईट शब्दही बोललो नाही, पण आता ते आम्हाला टार्गेट करत आहेत.’