Raj Thackeray: परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
MNS Leader Raj Thackeray (Photo Credits-Twitter)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. या पत्रात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असे परमबीर सिंह या पत्रातून म्हणाले आहेत. यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलाच पेट घेतला आहे. यासंदर्भात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही प्रकरणात उडी घेतली आहे. तसेच अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशा आशयाचे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे. हे देखील वाचा-Aaditya Thackeray Tests Positive for COVID19: महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण; नागरिकांना केली 'अशी' विनंती

राज ठाकरे यांचे ट्विट

"गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा सचिन वाझे यांना त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलवले होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, गृहमंत्र्यांनी वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते. मुंबईतील बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांकडून 40-50 लाख आणि उरलेले पैसे इतर मार्गाने जमा करता येतील, असे गृहमंत्र्यांनी वाझे यांना सांगितले होते", असे परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केले आहे.