Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) आणखी मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. यातच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी स्वत: ट्विट केले आहे. माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. नागरिकांनी कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. हे देखील वाचा- Covid-19 Vaccine निर्मितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई मधील Haffkine Institute ला भेट

आदित्य ठाकरे यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात शुक्रवारी (19 मार्च) 25 हजार 681 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 14 हजार 400 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील एकूण 21 लाख 89 हजार 965 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 77 हजार 560 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.42% झाले आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.