Covid-19 Vaccine निर्मितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई मधील Haffkine Institute ला भेट
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवण्याकडे सरकारचे लक्ष आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात लस उत्पादन करण्याचाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा मानस असून त्यास परवानगी देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यावर यासंदर्भातील प्रस्ताव दिल्यास त्यास मंजुरी देण्यात येईल, असे मोदींनी सांगितले. या प्रस्तावास परवानगी मिळाल्यास पुढील काही महिन्यात राज्यात लस उत्पादनाला सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील (Mumbai) हाफकीन इन्सिट्यूटला (Haffkine Institute) भेट दिली.

यावेळी त्यांनी संस्थेची पाहाणी करुन तेथील अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. या बैठकीत त्यांनी लस निर्मितीबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसंच वर्षाला 22 कोटी लसीचे डोसेस बनवण्याचाही सरकारचा विचार असल्याचेही समजते. (कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; लसीकरणासंदर्भात दिले 'हे' निर्देश)

CMO Maharashtra Tweet:

हाफकीन इन्सिट्यूट ही राज्यातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठीत संस्था असून केंद्राकडून परवानगी मिळाल्यास कोविड19 लसीचे दररोज 1 लाख डोस या संस्थेत तयार करण्यात येतील. दरम्यान, पोलिसो, प्लेग, धनुर्वात आणि इतर साथीच्या रोगांवरील लसीचे डोस या संस्थेमार्फत तयार करण्यात आले होते. आता कोरोनामुक्तीच्या लढ्यातही या संस्थेची साथ मोलाची ठरु शकते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोविड-19 लसीचे डोसेस मर्यादीत असल्याची तक्रार राज्य सरकारकडून करण्यात येत होती. तर लसीकरणाचा वेग मंदावल्याची टीका विरोधकांकडून होत होती. त्यामुळे कोविड-19 संकटात हे वाद टाळण्यासाठी राज्यातच लस उत्पादन करण्याचा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे.