मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांचा राजकीय जीवनप्रवास
Chhagan Bhujbal (Photo Credits: Facebook)

मुंबईत येथील भायखळा मार्केटमध्ये आपल्या आईसोबत फळांची विक्री करणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी भारावून गेला होता. त्यानंतर हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्याने राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला. काहीक्षणातच राजकारणात आपली छाप सोडणारा तरुण म्हणजे छगन चंद्रकांत भुजबळ. त्यावेळी छगन भुजबळ हे व्हिजेआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते. परंतु, त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांचे शिक्षण अर्ध्यातच सोडले. तळागाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेना पक्षातील महत्वाचे नेते म्हणून चर्चेत आले.

छगन भुजबळ यांची 1985 मध्ये मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनासोबतच भुजबळांचे राजकीय ओळख निर्माण झाली. एका वर्षानंतर 1986 कर्नाटकमध्ये सीमापश्न पेटला होता. त्यावेळी छगन भुजबळांचे नाव एका वेगळ्या कारणांमुळे देशभरात गाजले. त्यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी होती. दरम्यान, छगन भुजबळ व्यापाराची वेशभुषा धारण करुन बेळगावात गेले होते. हिदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची युती केली. आयोध्यातील बाबरी मशीद पाडण्यासाठी दोन्ही पक्षानी आक्रमक भुमिका घेतली होती. याचाच फायदा शिवसेनेला 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाला. त्यावेळी शिवसेनेचे एकूण 52 आमदार निवडून आले होते. त्यावेळी विरोधी पक्षात बसली असून बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधीपक्षनेत्याचे पद दिले होते. यावर नाराजी व्यक्त करत भुजबळ यांनी शिवसेना पक्षाची सात सोडून 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात 9 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे देखील वाचा- 'महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे टिकणार! तुम्ही म्हणत असाल तर, स्टँपपेपरवरही लिहून देतो'- अजित पवार

पुढे 1999 साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. त्याच वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आले आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. भुजबळ 2004 पासून 2014पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत जमिनी बळकावल्याचे आरोप झाले. पण हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले होते. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला. छगन भुजबळ यांना 2016 मध्ये बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरुन अटक झाली होती. जवळपास 26 महिने छगन भुजबळ जेलमध्ये होते. गृहमंत्री असताना त्यांनी आर्थर जेलमध्ये अंडा सेलची निर्मिती केली होती. त्याच अंडा सेलमध्ये भुजबळांची पहिल्यांदा रवानगी झाली.

सध्या छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षात सक्रिय असून नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी येवला मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तिन पक्षांची मिळून तयार झालेल्या महाविकासआघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. तसेच, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही उद्धव ठाकरे यांच्याच शिरावर आली आहे. त्यामुळे राज्यशकट हाकण्यासाठी मुख्यमंत्री पदावर आरुड होणारे उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे आज (गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनीही आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.