'महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे टिकणार! तुम्ही म्हणत असाल तर, स्टँपपेपरवरही लिहून देतो'- अजित पवार
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडीचे सत्ता स्थापन होणार असून यांच सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. यातच सकाळपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले मत मांडले आहे. महाविकास विकास आघाडीचे सरकापर पूर्ण 5 वर्ष टिकणार असून यात माझ्या मनात काहीही शंका नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच आज अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासोबत शपथनविधीसाठी जाणार असल्याचेही त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीने एकत्र निवडणूक लढवली होती. तसेच महाराष्ट्राच्या जनेत महायुतीला कौल दिला असताना मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु झाला. या वादातून अखेर 30 वर्षापासून असलेली युती तुटली. त्यानंतर शिवसेना पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत हात मिळवणी करुन राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. यामुळे लवकरच महाराष्ट्राला महाविकास आघाडीचे सरकार पाहायला मिळणार आहे. परंतु, शिवसेना आणि काँग्रेस परस्पर विरोधी विचारधारेचे असल्यामुळे यांचे सरकार अधिक काळ टिकणार असे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवत म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे टिकणार यात माझ्या मनात काहीही शंका नाही. तुम्ही म्हणत असाल तर, स्टँपपेपरवरही लिहून देतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी त्यावेळी केले. हे देखील वाचा-सत्ता आली पण पत्ता गेला; उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री ते सिल्व्हर ओक' प्रवासावर सुमित राघवन चा निशाणा ; पहा ट्विट

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, 'मी आज माझी बहिण सुप्रियासोबत शपथविधीसाठी जाणार आहोत. माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही मी तुम्हाला नाराज दिसतो आहे का?' असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.