देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, शरद पवार यांच्या ट्विटर फॉलोअर्स संख्येत वाढ, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या तुलनेत सोशल मीडियात भाजप आघाडीवर
Devendra Fadnavis Sharad PawarAditya ThackerayAshok Chavan | (Photo credit: Archived, edited, representative images)

विधानसभा निवडणूक रणधुमाळी 2019 (Maharashtra Assembly Elections2019) ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांसारख्या नेत्यांसोबच महाराष्ट्र भाजपा (BJP), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यासारख्या राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया पेज आणि अकाउंट्सना चांगलीच फायद्याची ठरली आहे. एका आकडेवारीनुसार निवडणुक काळात महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते आणि विविध पक्षांच्या सोशल मीडिया पेज आणि अकाऊंट्स फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोशल मीडिया (Social Media) म्हणून गणल्या जाणाऱ्या फेसबुक, ट्विटर (Twitter), इन्स्टाग्राम आदींवर ही आकडेवारी पाहाला मिळते. खास करुन राजकीय नेते आणि विविध पक्षांच्या ट्विटरवरील अकाऊंट्सची संख्या प्रचंड मठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळते.

महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांसाठी 21 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. निवडणूक जाहीर झाल्याची तारीख (21 सप्टेंबर 2019) ते 19 ऑक्टोबर 2019 (निवडणूक प्रचार थांबण्याची तारीख ) या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विटरवरील फॉलोअर्स संख्या 37.55 लाखांवर पोहोचली आहे. निवडणुक काळात ही संख्या 23,235 इतकी वाढली. या काळात मुख्यमंत्र्यांनी 429 ट्विट केले. शिवसेना युवा नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याही फॅन फॉलोअर्स संख्येत कमालीची वाढ पाहायला मिळते. आदित्य ठाकरे यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत 17,357 हजारांनी वाढ होऊ ती तब्बल 18,87 लाखांवर पोहोचली आहे. आदित्य ठाकरे यांनी या काळात 75 ट्विट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ट्विटर वरील फॅन फॉलोअर्स संख्या 12.68 लाखांवर पोहोचली आहे. निवडणुक काळा शरद पवार यांची फॅन फॉलोअर्स संख्या 17,357 हजारांनी वाढली. शरद पवारांनी या काळात 270 ट्विट्स केले. अशोक चव्हाण यांच्याही फॅन फॉलोअर्स संख्येत 4,155 हजारांची वाढ पाहायला मिळते. अशोक चव्हाण यांनी केवळ 44 ट्विट केल्याचे पाहायला मिळते. (हेही वाचा, अबब! भाजपकडे पैसाच पैसा.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खर्च केली विरोधकांपेक्षा चौपट रक्कम: ADR अहवाल)

भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra)

दरम्यान, राजकीय नेत्यांसोबत राजकीय पक्षांच्य ट्विटर अकाउंट्सवरही फॅन फॉलोअर्सची संख्या चांगलीच वाढल्याचे दिसले. यात भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) आघाडीवर आहे. भाजप महाराष्ट्र ट्विटर अकाउंट वर 29 दिवसांत (21 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर) तब्बल 10 हजार फॉलोअर्स वाढले. या कालावधीत भाजपने 1,036 इतके ट्विट केले. म्हणजेच महाराष्ट्र भजपाने प्रतिदिन 36 ट्विट केले.

शिवसेना (@ShivSena)

शिवसेना (@ShivSena) पक्षाच्या ट्विटर हँडलवर फॉलोअर्सची संख्या 1,98,569 वर पोहोचली. 20 सप्टेंबर या दिवश शिवसेना (@ShivSena) अकाउंटवर फॉलोअर्स संख्या 1,90,791 इतकी होती. 19 ऑक्टोबर पर्यंत तो आकडा 7,778 हजारांनी वाढून 1,98,569 वर पोहोचला. या काळात या हँडलवर 396 ट्विट करण्यात आले. म्हणजेच या हँडलवर प्रतिदिन 15 ट्विट करण्यात आले.

महाराष्ट्र कांग्रेस (@INCMaharashtra)

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवर 29 दिवसात केवळ 513 इतकीच ट्विट करण्यात आली. निवडणूक लागल्यापासून प्रचार थांबण्याच्या दिवसापर्यंत महाराष्ट्र काँग्रेस ट्विटर हँडलवर फॅन फॉलोअर्सची संख्या केवळ 7,771 इतक्या संख्येत वाढली. म्हणजेच 19 ऑक्टोबर पर्यंत या काँग्रेस पक्षाच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 1,14,329 इतकी राहिली.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 सप्टेंबर रोजी निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक रणधुमाळी अधिकृतपणे सुरु झाली. निवडणूक प्रचारात राजकीय पक्षने अथवा नेत्याने कोणतीही कसर सोडली नाही. आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे, आव्हान आणि सनसनाटी वक्तव्यांनी हा काळ चर्चेत राहिला. नामुष्कीची बाब अशी की, या निवडणुकीत विकासकामे, जनतेचे मुद्दे यांपेक्षा राजकीय पक्ष, नेत्यांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपांना महत्त्व दिले. त्या तुलनेत सरकारने केलेला विकास, जनतेच्या समस्या आणि विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर अल्प प्रमाणातच चर्चा झाली.