Maharashtra Second Phase Poll Date, Schedule, Constituencies And andidates List: लोकसभा निवणूक 2019 जिंकायचीच या विचाराने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्र राज्यही याला अपवाद नाही. लोकसभा निवडणूक देशभरात सात टप्प्यात पार पडत आहे. महाराष्ट्रात मात्र ही निवडणूक 4 टप्प्यात पार पडत आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीही राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दुसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणारे मतदारसंघ आणि उमेदवार अशी संयुक्त यादी आम्ही आमच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. या यादीत काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , भाजप (BJP) , शिवसेना (Shiv Sena), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आदी राजकीय पक्ष आणि आघाड्यांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणूक 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (दुसरा टप्पा, मतदान 18 एप्रिल 2019)
लोकसभा निवडणूक 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (दुसरा टप्पा, मतदान 18 एप्रिल 2019) |
||||
मतदान दिनांक | लोकसभा मतदारसंघ | शिवसेना/भाजप उमेदवार | काँग्रेस/राष्ट्रवादी उमेदवार | बहुजन वंचित आघाडी आणि इतर उमेदवार |
18 एप्रिल 2019 (गुरुवार)
18 एप्रिल 2019 (गुरुवार) |
बुलडाणा | प्रताप जाधव (शिवसेना) | राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) | बळीराम सिरस्कार (BVH) |
अकोला | संजय धोत्रे (भाजप) | हिदायत पटेल (काँग्रेस) | ||
अमरावती | आनंदराव आडसूळ (शिवसेना) | नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस) | गुणवंत देवपारे (BVH) | |
हिंगोली | हेमंत पाटील (शिवसेना) | सुभाष वानखेडे (काँग्रस) | मोहन राठोड (BVH) | |
नांदेड | प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) | अशोक चव्हाण (काँग्रेस) | यशपाल भिंगे (BVH) | |
परभणी | संजय जाधव (भाजप) | राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) | आलमगीर खान अखिल मोहम्मद (BVH) | |
बीड | डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) | बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस) | विष्णू जाधव (BVH) | |
उस्मानाबाद | ओमराजे निंबाळकर (शिवसेना) | राणाजगजित सिंह (राष्ट्रवादी काँग्रेस) | अर्जुन सलगर (BVH) | |
लातूर | सुधाकर श्रृंगारे (भाजप) | मच्छिंद्र कामत (काँग्रेस) | राम गारकर (BVH) | |
सोलापूर | डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) | सुशिल कुमार शिंदे (काँग्रेस) | प्रकाश आंबेडकर (VBA) |
(हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी लोकसभा निवडणूक प्रणाली आणि एकूण कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरात एकूण 7 टप्प्यांत ही निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघात निवडणूक पार पडेल. दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघा, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघात, तर चौथ्या टप्प्यात टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघात, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांतील 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात व सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आठ राज्यातील 59 मतदासंघात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार चार टप्प्यात पार पडत आहे. लोकसभा निवडणूक मतदानर पार पडल्यावर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकाल काय लागतो याकडे राजकीय पक्षांसोबतच सर्वसामान्य जनतेलाही प्रचंड उत्सुकता आहे.