Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी
List of Maharashtra Lok Sabha Constituencies And Political Parties Candidates (Only representative image)

List of Maharashtra Lok Sabha Constituencies And Political Parties Candidates: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) कार्यक्रम जाहीर केला आणि राजकीय पक्ष कामाला लागले. लोकसभेच्या एकूण 555 जागांपैकी 543 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये ही निवडणूक पार पडत आहे. मराहाष्ट्र लोकसभा मतदारसंघही याला अपवाद नाहीत. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघमध्ये ही निवडणूक पार पडत आहे. या 48 मतदारसंघात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , भाजप (BJP) , शिवसेना (Shiv Sena), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांसारख्या प्रमुख राजकीय पक्ष आणि आघाड्यांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. इथे आम्ही महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ (List of Maharashtra Lok Sabha Constituencies) आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी देत आहोत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक दिनांक 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार चार टप्प्यात पार पडत आहे. त्यामुळे ही यादी मतदानटप्पा आणि मतदारसंघ निहाय आहे.

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (मतदान टप्पानिहाय)

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (पहिला टप्पा, मतदान 11 एप्रिल 2019)
मतदान दिनांक लोकसभा मतदारसंघ शिवसेना/भाजप उमेदवार काँग्रेस/राष्ट्रवादी उमेदवार बहुजन वंचित आघाडी आणि इतर उमेदवार
11 एप्रिल 2019

(गुरुवार)

वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस) धनराज वंजारी (BVH)
रामटेक कृपाल तुमाणे (शिवसेना किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) किरण रोडगे (BVH)
नागपूर नितीन गडकरी (भाजप) नाना पटोले (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप) नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी काँग्रेस) एन. के नान्हे (BVH)
गडचिरोली-चिमूर अशोक नेते (भाजप) नामदेव मुसंडी (काँग्रेस) रमेश गजबे (BVH)
चंद्रपूर हंसराज अहिर (भाजप) सुरेश उर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस) राजेंद्र मोहोळ (BVH)
यवतमाळ-वाशिम भावना गवळी (शिवसेना) माणिकराव ठाकरे (काँग्रेस) प्रवीण पवार (BVH)

 

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (दुसरा टप्पा, मतदान 18 एप्रिल 2019)

 

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (दुसरा टप्पा, मतदान 18 एप्रिल 2019)
मतदान दिनांक लोकसभा मतदारसंघ शिवसेना/भाजप उमेदवार काँग्रेस/राष्ट्रवादी उमेदवार बहुजन वंचित आघाडी आणि इतर उमेदवार
 

 

 

 

18 एप्रिल 2019 (गुरुवार)

 

 

 

 

 

 

18 एप्रिल 2019 (गुरुवार)

बुलडाणा प्रताप जाधव (शिवसेना) राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) बळीराम सिरस्कार (BVH)
अकोला संजय धोत्रे (भाजप) हिदायत पटेल (काँग्रेस)
अमरावती आनंदराव आडसूळ (शिवसेना) नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस) गुणवंत देवपारे (BVH)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना) सुभाष वानखेडे (काँग्रस) मोहन राठोड (BVH)
नांदेड प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) अशोक चव्हाण (काँग्रेस) यशपाल भिंगे (BVH)
परभणी संजय जाधव (भाजप) राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) आलमगीर खान अखिल मोहम्मद (BVH)
बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस) विष्णू जाधव (BVH)
उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना) राणाजगजित सिंह (राष्ट्रवादी काँग्रेस) अर्जुन सलगर (BVH)
लातूर सुधाकर श्रृंगारे (भाजप) मच्छिंद्र कामत (काँग्रेस) राम गारकर (BVH)
सोलापूर डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) सुशिल कुमार शिंदे (काँग्रेस) प्रकाश आंबेडकर (VBA)

(हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्रात विद्यमान 11 खासदारांना प्रमुख पक्षांकडून डच्चू; पक्षाने नाकारली उमेदवारी, पाहा यादी)

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (तिसरा टप्पा, मतदान 23 एप्रिल 2019)

 

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (तिसरा टप्पा, मतदान 23 एप्रिल 2019)
मतदान दिनांक लोकसभा मतदारसंघ शिवसेना/भाजप उमेदवार काँग्रेस/राष्ट्रवादी उमेदवार बहुजन वंचित आघाडी आणि इतर उमेदवार
 

 

 

23 एप्रिल 2019

(मंगळवार)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

23 एप्रिल 2019

(मंगळवार)

जळगाव उन्मेष पाटील (भाजप) गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) अंजली बावीस्कर (BVH)
रावेर रक्षा खडसे (भाजप) डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस) नितीन कांडेलकर (BVH)
जालना रावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे (काँग्रेस) शरदचंद्र वानखेडे (BVH)
औरंगाबाद चंद्रकांत खैरे (शिवसेना) सुभाष झांबड (काँग्रेस)
रायगड अनंत गीते (शिवसेना) सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) सुमन कोळी (BVH)
पुणे गिरीश बापट (भाजप) मोहन जोशी (काँग्रेस) अनिल जाधव (BVH)
बारामती कांचन कुल (भाजप) सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कांग्रेस) नवनाथ पडळकर
अहमदनगर सुजय विखे पाटील (भाजप) संग्राम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस सुधाकर लक्ष्मण आव्हाड
माढा रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) संजय शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजय मोरे (BVH)
सांगली संजयकाका पाटील (भाजप) विशाल पाटील (स्वा.शेतकरी संघटना) गोपीचंद पडळकर (VBH)
सातारा नरेंद्र पाटील (शिवसेना) उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) सहदेव ऐवळे (VBH), आनंदा थोरवडे (बसपा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना) नविनचंद्र बांदोडकर (काँग्रेस) निलेश राणे (म. स्वा. प.), मारुती जोशी (VBH)
कोल्हापूर संजय मंडलिक  (शिवसेना) धनंजय महाडिक (राष्ट्रवादी काँग्रेस) अरुणा माळी (VBH)
हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना) राजू शेट्टी (स्वा. शेतकरी संघटना) अस्लम सय्यद (VBH)

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (चौथा टप्पा, मतदान 29 एप्रिल 2019)

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (चौथा टप्पा, मतदान 29 एप्रिल 2019)
मतदान दिनांक लोकसभा मतदारसंघ शिवसेना/भाजप उमेदवार काँग्रेस/राष्ट्रवादी उमेदवार बहुजन वंचित आघाडी आणि इतर उमेदवार
29 एप्रिल 2019 (सोमवार) नंदुरबार डॉ. हिना गावीत (भाजप) के. सी. पडवी (काँग्रेस)
 

 

 

 

 

29 एप्रिल 2019 (सोमवार)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

29 एप्रिल 2019 (सोमवार)

 

 

 

 

 

 

 

29 एप्रिल 2019 (सोमवार)

धुळे डॉ. सुभाष भामरे (भाजप) कुनाल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) दाजमल गजमल मोरे (VBH)
दिंडोरी भारती पवार (भाजप) धनराज महाले (काँग्रेस) बापू केळू बर्डे (BVH)
नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना) समिर भुजबळ (रा. काँग्रेस) पवन पवार (BVH)
पालघर राजेंद्र गावित (शिवसेना) सुरेश पडवी (काँग्रेस) बाळाराम पाटील (बविआ)
भिवंडी कपील पाटील (भाजप) सुरेश टावरे (काँग्रेस) ए. डी. सावंत (BVH)
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना) बाबाजी पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
ठाणे राजन विचारे (शिवसेना) आनंद परांजपे (रा.काँग्रेस) मल्लिकार्जून पुजारी (VBH)
मुंबई उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
मंबई वायव्य गजानन किर्तीकर (शिवसेना) संजय निरुपम (काँग्रेस) मोहन राठोड (BVH)
मुंबई इशान्य मनोज कोटक (भाजप) संजय दिना पाटील (रा. काँग्रेस) संभाजी शिवाजी काशीद (BVH)
मुंबई उत्तर मध्य पुनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस)
मुंबई दक्षिण-मध्य राहुल शेवाळे (शिवसेना) एकनाथ गायकवाड (काँग्रेस) संजय भोसले (BVH)
मुंबई दक्षिण अरविंद सावंत (शिवसेना) मिलिंद देवरा (काँग्रेस) अनिल कुमार (BVH)
मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना) पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) राजाराम पाटील (BVH)
शिरुर शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) अमोल कोल्हे (रा.काँग्रेस) राहुल ओव्हाळ (BVH)
शिर्डी सदाशिव लोखंडे (शिवसेना) भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) अरुण साबळे (BVH)

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी लोकसभा निवडणूक प्रणाली आणि एकूण कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरात एकूण 7 टप्प्यांत ही निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघात निवडणूक पार पडेल. दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघा, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघात, तर चौथ्या टप्प्यात टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघात, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांतील 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात व सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आठ राज्यातील 59 मतदासंघात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार चार टप्प्यात पार पडत आहे.