Lok Sabha Election 2024: महायुतीच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभेच्या जागा लढवणारच - अजित पवारांची घोषणा
Ajit Pawar | Twitter

देशात चार राज्यांमधील विधानसभा पार पडल्यानंतर आता सार्‍याच पक्षांची आगामी लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Election 2024) तयारी सुरू झाली आहे. आज पक्षाच्या शिबिरामध्ये बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) या निवडणूकांबाबत त्यांची भूमिका देखील बोलून दाखवली आहे. यावेळी महायुतीच्या महायुतीच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं म्हटलं आहे. उबाठा च्या देखील ज्या जागांवर शक्य होईल तेथे शिंदे गट आणि भाजपाशी बोलून आपण जागांबद्दल निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच अजित पवारांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून लोकसभेवर जातात. एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सध्या एनसीपी कुणाची यावरून अजित पवार आणि शरद पवार एकमेकांसमोर ठाकले असताना आता त्यांनी बारामती मध्ये बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरूद्धही निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस जाहीर केला आहे. यासोबतच शिरूर मध्येही अमोल कोल्हे खासदार आहे. सध्या कोल्हे शरद पवारांसोबत आहेत. तर सातारा मधूनही श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे जुने स्नेही विद्यमान खासदार आहेत. केवळ रायगडचे खासदार सुनील तटकरे सध्या अजित पवारांसोबत आहेत.

सगळ्या घटक पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीचा काम करायचे आहे असे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका...लक्ष देणारे लक्ष देतील असं म्हणत त्यांनी मीडीयाकडे लक्ष न देण्याचेही म्हटलं आहे. Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात भाजपचे मिशन 48, लोकसभा निवडणुकीसाठी नेत्यांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी, पाहा यादी .

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी फॉर्म्युला ठरला असून भाजपा 26 आणि शिंदे, पवार गट 22 जागा लढवणार आहेत.