Indian General Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024 साठी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा जिंकायचीच या विश्वासाने कामाला लागलेल्या भाजपने महाराष्ट्रात मिशन 48 सुरु केले आहे. त्यासाठी भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून भाजपमधील मतदारसंघातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. यात विनय सहस्त्रबुद्ध, मुरलीधर मोहोळ, देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे, धनंजय महाडिक यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपने सर्वच मतदारसंघामध्ये निवडणूक प्रमुख जाहीर केल्याने एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. कारण भाजपने जर 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमले असतील तर मग शिंदे गटाला भाजप लोकसभेच्या जागा सोडणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजपने लोकसभा मतदारसंघात निवडलेल्या निवडणूक प्रमुखांची यादी
Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात भाजपचे मिशन 48, लोकसभा निवडणुकीसाठी नेत्यांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी, पाहा यादी
कोण कोण निवडणूक प्रमुख?
मुंबई उत्तर - योगेश सागर
मुंबई उत्तर पश्चिम - अमित साटम
मुंबई उत्तर पूर्व - भालचंद्र शिरसाट
मुंबई उत्तर मध्य - पराग अळवणी
मुंबई दक्षिण मध्य - प्रसाद लाड
बई दक्षिण - मंगलप्रभात लोढा
ठाणे - विनय सहस्रबुद्धे
मावळ - प्रशांत ठाकूर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग - प्रमोद जठार
कोल्हापूर - धनंजय महाडिक
हातकणंगले - सत्यजीत देशमुख
सांगली - दीपक शिंदे
सातारा - अतुल भोसले
सोलापूर - विक्रम देशमुख
माढा- प्रशांत परिचारक
जालना - विजय औताडे
लातूर - दिलीप देशमुख
छत्रपती संभाजीनगर - समीर राजूरकर
दिंडोरी - बाळासाहेब सानप
वर्धा - सुमीत वानखेडे
पुणे - मुरलीधर मोहोळ
बारामती - राहुल कुल
शिरुर - महेश लांडगे
ट्विट
महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. सर्व नियुक्त प्रमुखांचे अभिनंदन!
सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील.… pic.twitter.com/xdDXVVSbVy
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 8, 2023
मूळ शिवसेनेतून बाजूला झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सध्या 13 खासदार आहेत. मूळ शिवसेनेने या आधीच्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता युतीच्या जागावाटपात भाजप शिंदे गटाला किती जागा द्यायला इच्छुक आहे, याबाबत उत्सुकता आहे.