Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदारसंघातून Sunil Tatkare यांना उमदेवारी जाहीर; 'बारामती' च्या जागेबद्दल पहा काय म्हणाले अजित पवार
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Election) धामधूम सुरू झाली असली तरीही अद्याप राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. अजित पवारांनी (Ajit Pawar) आज पुण्यात केवळ रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना उमदेवारी जाहीर केली आहे. शरद पवारांपासून दूर जात अजित पवार महायुती मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे एकच लोकसभेचे खासदार सोबत होते. त्यामुळे आता जागावाटपात अजित पवारांच्या वाट्याला किती जागा येणार याची चर्चा सुरू आहे.

आगामी लोकसभा निवडणूक ही शिवसेना आणी एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतरची पहिलीच निवडणूक असल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाचा कस लागणार आहे. अजित पवारांसाठी लोकसभेची बारामती ची जागा खास आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांनी पुन्हा संधी दिली आहे. तर दुसरीकडे महायुतीमधूनच विजय शिवतारे यांनी अजित पवारांना आव्हान देत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार अजित पवार बारामती मधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवारांनी शिवतारेंवर भाष्य टाळलं आहे. तर बारामतीचा उमेदवार 28 तारखेला जाहीर करतो. तुमच्या मनातील उमेदवार जो उमेदवार आहे, तोच आमचा उमेदवार असेल. असं म्हणत नकळत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब केले आहे. Lok Sabha Elections 2024: विजय शिवतारे 12 एप्रिलला बारामती लोकसभा मतदारसंघातून भरणार उमेदवारी अर्ज .

दरम्यान राष्ट्रवादीला तीन - किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या सुरू असल्याचं म्हटलं आहे. सातार्‍याची जागा देखील अजून जाहीर झालेली नाही. उदयनराजेंना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील. असे ते म्हणाले आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील 20 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून शिवसेनेत गेले होते. ते आमचे शिरुरचे उमेदवार असणार आहेत. असेही अजित पवार म्हणाले.

28 मार्चला महायुतीची  उमेदवार यादी

महायुती 28 मार्चला आपली उमेदवार यादी जाहीर करणार असल्याचंही अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे उमेदवार यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज एनसीपीची बैठक झाली आहे.