Mumbai High Court (Photo Credit: ANI)

सायबर दहशतवाद (Cyber Terrorisms) प्रकरणात अभियंता असलेल्या एका तरुणाला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) झाली आहे. सायबर दहशतवाद प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा होण्याची देशभरातील बहुता ही पहिलीच घटना आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका प्रकरणात ही शिक्षा ठोठावली. अनिस शकिल अन्सारी असं आरोपीचे नाव आहे. व्यवसायाने तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मेरिकन स्कूलवर सुसाईड बॉम्ब हल्ला करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने त्याला 2014 मध्ये अटक केली होती.

दहशतवाद विरोधी पथकाने नोंदविलेल्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आतापर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण निकालांपैकी एक म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे. बीकेसीतील एका अमेरिकन स्कुलवर आत्मघातकी हल्ला करण्याचा कट आरोपीने रचला होता. या कटाबाबात माहिती मिळताच एटीएसने त्याला 2014 मध्ये तातडीने अटक केली होती. (हेही वाचा, Mumbai High Court: पत्नीला मुल जन्माला घालण्यासाठी सक्ती करता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालय)

महत्त्वाचे असे की, सायबर दहशतवाद प्रकरणात देशात पहिल्यांदाच निकाल देण्यात आला आहे. त्यातही आरोपीला जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा ठोठावण्यात आल्याने अशा प्रकरणांचे महत्त्व आणि त्यातील धोके आणखी अधोरेखीत झाले आहेत. न्यायालयाने दोषी आढळलेल्या शकील अन्सारी या अभियंता असलेल्या आरोपीस सायबर दहशतवाद कायद्याअंतर्गत 5 वर्षांची आणि आजीवन शिक्षा सुनावली. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनआर आहे. त्याने एक फेक प्रोफाईल बनवून बॉम्ब बनविण्याचे षडयंत्र रचले होते. हे षडयंत्र रचून तो अमेरिकन शाळेवर हल्ला करणार होता. परंतू, त्याचा कट एटीएसने सावधगिरीने उधळून लावला.

सायबर दहशतवाद प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची देशभर चर्चा सुरु आहे. देशभरातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या काही प्रमुख खटल्यांप्रमाणेच या खटल्याकडेही पाहिले जात आहे. आरोपीच्या वकिलांनी आरोपीला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतू, साक्ष, पुरावे आणि वस्तुस्थिती आरोपीच्या पूर्ण विरोधात होती. परिणामी आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली.