
Fire At Cloth Warehouse In Bhiwandi: भिवंडीतील (Bhiwandi) एका कापडाच्या गोदामात शनिवारी रात्री आग (Fire) लागली. सुदैवाने या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भिवंडीतील राहनाल गावात असलेल्या कापड साठवलेल्या गोदामात ही आग लागली. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आग विझविण्यासाठी तीन अग्निशमन गाड्या आणि तीन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाले.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे 2 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर, शीतकरण ऑपरेशन सुरू करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीत गोदामातील कपड्यांची राख झाली आहे. आगीच्या घटनेत गोदामाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. अद्याप या आगीमागील कारण अस्पष्ट आहे. (हेही वाचा - Mumbai Fire: मुंबईच्या मस्जिद बंदर येथे इमारतीला आग; धुरामुळे 2 जणांचा मृत्यू (Video))
भिवंडी अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेश पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्याकडे कोणतेही उंचावरील अग्निशमन दलाचे बंब नाहीत. परिसरात लॉजिस्टिक्स हब आणि गोदामांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत आमच्याकडे फक्त सात अग्निशमन इंजिन आणि तीन मोटरसायकल अग्निशमन इंजिन आहेत. तथापि, लॉजिस्टिक्स हब आणि गोदामांमध्ये कोणतेही अग्निशमन उपकरणे बसवण्यात आलेली नाहीत. (हेही वाचा: Mumbai Fire: फोर्ट भागात Freemasons Hall मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल)
मुंबईतील मस्जिद बंदर इमारतीला आग; 2 जणांचा मृत्यू
मुंबईतील मस्जिद बंदर येथील राम मंदिराजवळील वडगडी येथील इस्साजी स्ट्रीटवर असलेल्या पन्न अली मॅन्शन या 12 मजली निवासी इमारतीत आज सकाळी आग लागली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला.