![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/35-196.jpg?width=380&height=214)
Lalu Prasad On Mahakumbh: राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी रविवारी महाकुंभाला (Mahakumbh 2025) 'निरर्थक आणि अर्थहीन' असं संबोधलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत (Stampede in New Delhi) 18 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेला जबाबदार धरले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील घटनेबद्दल त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच लालू यादव यांनी या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना लालू प्रसाद यादव म्हणाले की, 'ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि मी पीडितांप्रती शोक व्यक्त करतो. रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. कुंभमेळा निरुपयोगी आहे. चेंगराचेंगरीचा हा प्रकार अतिशय त्रासदायक आहे. या घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. हे रेल्वेचे पूर्णपणे अपयश आहे, असं लालू यादव यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर)
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 18 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. महाधार्मिक मेळाव्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या मोठ्या गर्दीबद्दल विचारले असता, लालू प्रसाद म्हणाले की, 'कुंभाला काही अर्थ नाही... तो निरर्थक आहे. (हेही वाचा - New Delhi Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 14 महिलांसह 18 जणांचा मृत्यू; महाकुंभला जाण्यासाठी झाली होती गर्दी)
तथापी, आता लालू प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, बिहार भाजपचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी म्हटलं आहे की, 'त्यांनी हिंदू धर्माबद्दल राजदची मानसिकता उघड केली आहे. ते तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अशी विधाने करत आहेत. राजद नेत्यांनी नेहमीच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान केला आहे. महाकुंभाला अर्थहीन म्हणणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या ताज्या विधानातून पक्षाची हिंदू धर्माबद्दलची मानसिकता उघड होते.'