शनिवारी रात्री नवी दिल्ली येथे एक दुर्दैवी घटना घडली. दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली व यामध्ये तीन मुलांसह अठरा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. मृतांपैकी बहुतेक बिहारमधील आहेत आणि त्यांची संख्या नऊ असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये आठ जण दिल्लीचे आणि एक हरियाणाचा होता. प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर पोहोचले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना रात्री 10 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म 13 आणि 14 वर चेंगराचेंगरी झाली. पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी रविवारी सांगितले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी आणि घटनेमागील कारणे शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच वेळी, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन घटनेत बाधित झालेल्या लोकांसाठी भरपाईची घोषणा करण्यात आली आहे आणि भरपाईचे वाटपही केले जात आहे. (हेही वाचा: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय झालं? पहा Deputy Commissioner of Police (DCP) Railway यांनी दिलेली माहिती)
New Delhi Station Stampede:
18 people including 14 women lost their lives in the stampede that occurred yesterday around 10 PM at New Delhi Railway station: Delhi Police
— ANI (@ANI) February 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)