![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/11/Ashwini-Vaishnaw.jpg?width=380&height=214)
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station) झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) 18 जणांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात महिला आणि अल्पवयीन मुलांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना रेल्वेने रविवारी प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये देण्यात येतील, असे रेल्वेने म्हटले आहे. शनिवारी रात्री उशिरा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्युंबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुःख व्यक्त केलं. वैष्णव यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासाठी माझ्या प्रार्थना आहेत. या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना मदत करण्यासाठी संपूर्ण टीम काम करत आहे. (हेही वाचा - New Delhi Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 14 महिलांसह 18 जणांचा मृत्यू; महाकुंभला जाण्यासाठी झाली होती गर्दी)
दिल्ली पोलिसांनी रविवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी सुरू केली आहे. गोंधळ उडण्यापूर्वीच्या घटनांचा क्रम निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले जाईल, असं सांगण्यात आलं आहे. आमचे मुख्य लक्ष्य चेंगराचेंगरीचे मुख्य कारण शोधणे आहे. आम्ही त्या काळात केलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि घोषणांचा सर्व डेटा गोळा करू, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (हेही वाचा: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय झालं? पहा Deputy Commissioner of Police (DCP) Railway यांनी दिलेली माहिती)
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू उपाध्याय यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी पाटणाला जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती. तसेचे नवी दिल्ली-जम्मू उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वर उभी होती. काही लोक जे पायऱ्या वापरून फूटओव्हर ब्रिजवरून प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर येत होते ते घसरले आणि गोंधळ निर्माण झाला.