
Delhi Railway Station Tragedy: दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत भारतात चेंगराचेंगरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये काही आठवड्यांपूर्वी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीचा समावेश आहे. 29 जानेवारी रोजी महाकुंभाच्या संगम परिसरात पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला. तर, 60 जण जखमी झाले होते. लाखो यात्रेकरू मौनी अमावस्येच्या निमित्ताने पवित्र स्नान करण्यासाठी जागा मिळावीसाठी धावत होते. अलिकडच्या काळात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या सर्वात मोठ्या जीवितहानींमध्ये गेल्या वर्षी २ जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे स्वयंघोषित देव भोले बाबा यांच्या 'सत्संगा' दरम्यान झालेल्या प्राणघातक चेंगराचेंगरीचा समावेश आहे, ज्यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतेक महिला होत्या.
2 जुलै 2024
हाथरस येथे स्वयंघोषित भोले बाबा उर्फ नारायण साकार यांच्या 'सत्संग'मध्ये चेंगराचेंगरी झाल्याने महिला आणि मुलांसह 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
31 मार्च 2023
इंदूरमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित 'हवन' कार्यक्रमादरम्यान विहिरी वर बांधलेला स्लॅब कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला.
1 जानेवारी 2022
जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला आणि असंख्य जण जखमी झाले.
29 सप्टेंबर 2017
पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकाला मुंबईतील मध्य रेल्वेच्या परळ स्थानकाशी जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला आणि 36 जण जखमी झाले.
14 जुलै 2015
आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे ‘पुष्करम’ उत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 27 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले.
3 ऑक्टोबर 2014
दसरा उत्सव संपल्यानंतर पाटण्यातील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जणांचा मृत्यू झाला आणि 26 जण जखमी झाले.
13 ऑक्टोबर 2013
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ नवरात्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 115 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक जण जखमी झाले.
8 नोव्हेंबर 2011
हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावरील हर-की-पौरी घाटावर चेंगराचेंगरीत 20 जणांचा मृत्यू झाला.
14 जानेवारी 2011
केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील पुलमेडू येथे घरी जाणाऱ्या यात्रेकरूंना जीपने धडक दिल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत 104 भाविकांचा मृत्यू झाला आणि 40 हून अधिक जण जखमी झाले.
4 मार्च 2010
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कृपालू महाराजांच्या राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 63 जणांचा मृत्यू झाला.
30 सप्टेंबर 2008
राजस्थानच्या जोधपूर शहरातील चामुंडा देवी मंदिरात बॉम्बस्फोटाच्या अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 250 भाविक मृत्युमुखी पडले. 60 हून अधिक जखमी झाले.
3 ऑगस्ट 2008
हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातील नैना देवी मंदिरात दगड कोसळल्याच्या अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 162 जण मृत्युमुखी पडले, 47 जण जखमी झाले.
25 जानेवारी 2005
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांडरदेवी मंदिरात यात्रेदरम्यान 340 हून अधिक भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. शेकडो जण जखमी झाले.
27 ऑगस्ट 2003
नाशिकमध्ये कुंभमेळ्यात पवित्र स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 39 जण मृत्युमुखी पडले. सुमारे 140 जण जखमी झाले.