Ganpati | File Image

हिंदू धर्मीय दर महिन्याला कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashta Chaturthi ) साजरी करतात. गणेशभक्तांसाठी ही संकष्टी चतुर्थी खास असते. या संकष्टीच्या निमित्ताने गणेशाची उपासना केली जाते. काही गणेशभक्त दिवसभराचा उपवास रात्री चंद्रोदयानंतर सोडतात त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व आहे. राज्यात विविध भागामध्ये चंद्रोदयाच्या वेळा या प्रांतानुसार वेगळ्या असतात. त्यामुळे संकष्टीला तुम्ही कुठे आहात? यावरून आजच्या उपवासाची रात्री सांगता करू शकाल.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. बाप्पाला दुर्वा,जास्वंद अर्पण केली जाते. नैवेद्यामध्येही उकडीचे मोदक केले जातात. संकष्टीच्या निमित्ताने गणेश मंदिरामध्येही मोठी गर्दी असते.(Sankashti Chaturthi HD Images: संकष्टी चतुर्थी निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, Wishes शेअर करत खास करा आजचा दिवस!).

महाराष्ट्रातील आजच्या चंद्रोदयाच्या वेळा

मुंबई - 21.49

पुणे- 21.44

नाशिक- 21.45

नागपूर- 21.24

रत्नागिरी- 21.46

बेळगाव- 21.40

गोवा- 21.43

कोल्हापूर- 21.42

सोलापूर - 21.35

संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि श्रीगणेशाच्या कृपेने सर्व कार्ये सफल होतात. या व्रतामध्ये चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय हे व्रत पूर्ण होणार नाही. अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे.