Michelle and Barack Obama. (Photo credits: Facebook and Instagram)

एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क (Errol Musk) हे दक्षिण आफ्रिकन राजकारणी आणि व्यावसायिक आहेत. यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. आता एका वादग्रस्त दाव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. एरॉल मस्क यांनी अलीकडेच माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा (Michelle Obama) यांच्याबद्दल दावे केले आहेत. 'वाइड अवेक पॉडकास्ट'वरील मुलाखतीत, एरॉल मस्क यांनी मिशेल ओबामा या ‘पुरुष आहेत ज्या स्त्रीच्या वेशात राहतात’, असा दावा केला आणि बराक ओबामा हे ‘समलैंगिक’ असल्याचे म्हटले.

या विधानांमुळे व्यापक टीका आणि वाद निर्माण झाले आहेत, कारण या दाव्यांना कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि ते पूर्वीच खोटे ठरवले गेले आहेत. एरॉल मस्क यांनी त्यांच्या मुलाच्या पालकत्वाबद्दलही टीका केली, एलॉन मस्क हे अनुपस्थित पिता असल्याचे सांगितले. एरॉल मस्क हे याधीही त्यांच्या स्पष्टवक्त्या आणि ऑनलाइन निराधार विधानांमुळे वादात सापडले आहेत. आता त्यांनी 'वाइड अवेक पॉडकास्ट' वर जोशुआ रुबिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'आम्हाला समजले की बराक ओबामा एक समलैंगिक आहेत, ज्यांनी एका स्त्रीसारखे कपडे घालणाऱ्या पुरुषाशी लग्न केले आहे.' हे ऐकून धक्का बसलेल्या जोशुआने विचारले, 'मिशेल ओबामा पुरुष आहेत?' त्यावर एरॉल म्हणतात, 'नक्कीच, तुम्हाला हे माहित नाही?'

यासाठी त्यांनी 2014 ध्ये व्हायरल झालेल्या कट रचनेचा उल्लेख केला, जेव्हा विनोदी कलाकार जॉन रिव्हर्सने माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या लिंगाबद्दल विनोद केला होता. एरॉल म्हणाले, ‘जॉन रिव्हर्सने त्याचा जाहीरपणे उल्लेख केला आणि तसे, दोन आठवड्यांनी तो मरण पावला. हे तर सामान्य ज्ञान आहे. तुम्ही ते कुठेही पाहू शकता.’ असा विचित्र दावा केल्यानंतर काही आठवड्यांनंतर 4 सप्टेंबर 2024 रोजी रिव्हर्सचा मेंदूला झालेल्या नुकसानीमुळे मृत्यू झाला. आजपर्यंत या दाव्यासाठी कोणताही पुरावा नाही. (हेही वाचा: Barack and Michelle Obama Divorce: बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचा घटस्फोट होणार? माजी फर्स्ट लेडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याने चर्चेला उधाण)

दरम्यान, बराक ओबामा आणि मिशेल यांची भेट 1989 मध्ये एका लॉ फर्ममध्ये झाली. त्यांनी 1992 मध्ये लग्न केले आणि ते मालिया आणि साशा या दोन मुलांचे पालक आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे घटस्फोट घेणार असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. दुसरीकडे, एरॉल मस्क यांनी विद्युत आणि यांत्रिक अभियांत्रिकी सल्लागार म्हणून काम केले आहे. ते प्रिटोरिया सिटी कौन्सिलवर स्वतंत्र सदस्य म्हणून 9 मार्च 1972 रोजी निवडून आले. नंतर, 1980 मध्ये, ते प्रोग्रेसिव्ह फेडरल पार्टीचे सदस्य झाले.