Michelle and Barack Obama. (Photo credits: Facebook and Instagram)

Barack and Michelle Obama Divorce: बराक ओबामा (Barack Obama) हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय राष्ट्राध्यक्षांपैकी एक समजले जातात. त्यांची पत्नी मिशेल ओबामा (Michelle Obama) या देखील जगातील एक प्रभावशाली व्यक्ती समजल्या जातात. अनेक कार्यक्रमांमध्ये या जोडप्याचे एकमेकांवरील प्रेम उघडपणे दिसून आले आहे. मात्र आता या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत सोशल मीडियावर ही अफवा जोरात चर्चेत आहे. आता लोकांना यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल या सोमवारी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत याची पुष्टी झाली आहे.

बराक ओबामा एकटेच या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. एका महिन्यात मिशेल ओबामा कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 60 वर्षीय मिशेल ओबामा या महिन्याच्या सुरुवातीला जिमी कार्टर यांच्या अंत्यसंस्कारात त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेत होत्या.

बराक आणि मिशेल ओबामा यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे ट्रंप यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निश्चित झाले आहे. माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आगामी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि त्यांच्या पत्नी लॉरा बुश शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा: Donald Trump's Swearing-in Ceremony: परराष्ट्र मंत्री S Jaishankar भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील; मंत्रालयाने केली पुष्टी)

आता मिशेल ओबामा शपथविधीला जाणार नसल्याने त्यांच्यात व बराक ओबामा यांच्यात सर्वकाही सुस्थितीत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या जोडप्याचा घटस्फोट होत आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र दुसरीकडे मिशेल ओबामा यांनी अनेकवेळा उघडपणे ट्रम्प यांच्याबद्दल त्यांचे वैर व्यक्त केले आहे, व हे देखील त्यांच्या अनुपस्थितीचे कारण असू शकते असे मानले जात आहे. दरम्यान, बराक आणि मिशेल ओबामा यांनी 1989 मध्ये डेटिंग सुरू केली आणि 1992 मध्ये लग्न केले. या जोडप्याला दोन मुली आहेत. मिशेल लॅव्हॉन रॉबिन्सन ओबामा यांचा जन्म जन्म 17 जानेवारी 1964 रोजी झाला. त्या एक अमेरिकन वकील, विद्यापीठ प्रशासक आणि लेखिका आहेत. त्यांनी 2009 ते 2017 पर्यंत युनायटेड स्टेट्सची फर्स्ट लेडी म्हणून काम केले. त्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन फर्स्ट लेडी होत्या.