येत्या 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताच्या वतीने या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. ट्रम्प-वन्स उद्घाटन समितीच्या निमंत्रणावरून जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतील. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालात ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. आपल्या अमेरिका दौऱ्यात परराष्ट्र मंत्री येणाऱ्या प्रशासनाच्या प्रतिनिधींची तसेच त्या निमित्ताने अमेरिकेला भेट देणाऱ्या काही मान्यवरांचीही भेट घेतील.
डोनाल्ड ट्रम्प 47व्यांदा आणि दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्या सरकारमध्ये अनेक भारतीय वंशाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वा.) शपथविधीला सुरुवात होईल. यामध्ये शपथविधी, परेड आणि औपचारिक कार्यक्रमांचा समावेश असेल. हा कार्यक्रम तुम्ही प्रमुख वृत्तवाहिन्यांवर थेट पाहू शकता. हा सोहळा वॉशिंग्टन डी.सी. मध्ये होणार आहे. (हेही वाचा: Chief Guest For Republic Day Parade: इंडोनेशियाचे राष्ट्रपती असणार यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे; भारत भेटीनंतर पाकिस्तानला जाणार नाहीत)
Donald Trump's Swearing-in Ceremony:
On the invitation of the Trump-Vance Inaugural Committee, External Affairs Minister, Dr. S. Jaishankar will represent the Government of India at the Swearing-in Ceremony of the President-Elect Donald J. Trump as the 47th President of the United States of America.
Press Release :…
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)