Blast At Explosives Manufacturing Firm In Nagpur (फोटो सौजन्य - IANS)

Blast At Explosives Manufacturing Firm In Nagpur: नागपूर (Nagpur) मधून मोठी बातमी समोर येत आहे. रविवारीनागपूर जिल्ह्यातील एका स्फोटक उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात (Blast) किमान दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या काटोल तहसीलमधील कोतवालबुडी येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड येथे दुपारी 1:30 वाजता स्फोट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या स्फोटोत दोन जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण शोधण्याचे काम सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या झाडीत किरकोळ आग लागली होती. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली. (हेही वाचा - Mumbai Fire: मुंबईच्या मस्जिद बंदर येथे इमारतीला आग; धुरामुळे 2 जणांचा मृत्यू (Video))

पहा व्हिडिओ - 

पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यासारख्या आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, काटोल आणि कळमेश्वर पोलिसांच्या पथकांसह घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.