भारतीय पोस्ट च्या नावे सध्या एक नवा स्कॅम सुरू आहे. यामध्ये खोटा डिलेव्हरी फेल्युअरचे मेसेज पाठवून युजर्सची दिशाभूल करण्यात येत आहे. याबाबत Press Information Bureau ने अफवा खोडून काढल्या आहेत. पीआयबी ने सांगितले की भारतीय पोस्ट कधीच अशाप्रकारे शेअर करत नाही. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने युजर्सना चेतावणी दिली आहे की इंडिया पोस्ट कधीही लिंक्सद्वारे पत्ते अपडेट करण्यास सांगणारे संदेश पाठवत नाही.स्कॅम मेसेज मध्ये डिलेव्हरी फेल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्ता अपडेट करण्यासाठी फसवी लिंक दिली जात आहे. या लिंक वर क्लिक केल्याने बनावट इंडिया पोस्ट च्या वेबसाईट वर नेले जात आहे. याद्वारा वैयक्तिक माहिती वर डल्ला मारला जातो. विशेष म्हणजे, फसव्या लिंक केवळ मोबाइल डिव्हाइसवर कार्य करते, डेस्कटॉपवर नाही. ग्राहकांना संशयास्पद संदेशांची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळावे.

पहा पीआयबी चा खुलासा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)