
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'छावा' (Chhaava) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विक्की कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांच्या मुखय भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्याच विकेंडला 100 कोटींचा गल्ला कमावण्याच्या तयारी मध्ये आहे. भारतासह देशा- परदेशातही या सिनेमाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली आहे. भारतात पहिल्या दोन दिवसांमध्येच 67 कोटींचा गल्ला कमावलेल्या छावा ची क्रेझ वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज वाढवण्याचे आणि महाराष्ट्रात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार वाढता प्रतिसाद पाहता छावा सिनेमाचे शो सकाळी 6 आणि मध्य रात्री 12 नंतरही वाढवले जाणार आहे. आज रविवार अर्थात सुट्टीचा वार म्हणून मुंबई, पुण्यात अधिक प्रेक्षकांना सिनेमा पाहता यावा यासाठी पहाटे 6 आणि रात्री 1, 1.30 च्या शोजची मागणी झाली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा 14 फेब्रुवारीला रीलीज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार मुंबई मध्ये रात्री 1.30 पर्यंत शेवटचा शो असेल. मात्र अद्याप त्याची ठोस माहिती नाही. शनिवारी रात्री छावा सिनेमाची ऑक्युपंसी मुंबईत 93% पुण्यात 97% होती. चैन्नईत 81% हैदराबाद मध्ये 88% होती. छावा सिनेमाने देशात दुसर्याच दिवशी 50 कोटींचा टप्पा पार केला होता. छावाची ओपनिंग डे ची कमाई 31 कोटीच्या पार होती. सध्या पुण्यात सकाळी 6 च्या शो साठी अधिक मागणी आहे. Vicky Kaushal Reaction On Chhaava Becomes Biggest Opener: 'छावा' चा प्रतिसाद पाहून भारावला विक्की कौशल;'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' म्हणत शेअर केली पोस्ट .
छावा या शिवाजी सावंतच्या कादंबरी वर सिनेमा बेतलेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल, येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना तर औरंगजेबची भूमिका अक्षय खन्नाने साकारली आहे. या सिनेमामध्ये अनेक मराठी कलाकारही विविध ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या पात्रांमध्ये दिसली आहेत. ज्यात सारंग साठे, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांचा समावेश आहे.