
अभिनेता विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava) रीलीज झाला आहे. सिनेमाच्या रीलीज दिवशीच दमदार कलेक्शन केल्याने सध्या सर्वत्र या सिनेमाची चर्चा सुरू आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर बेतला आहे. या सिनेमामध्ये विक्की कौशल प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात विक्की सोबतच अक्षय खन्ना ने साकारलेल्या औरंगजेब चा अभिनय प्रेक्षकांना थिएटर मध्ये खिळवून ठेवत आहे. पहिल्याच दिवशी 31 करोड ची कमाई केलेल्या 'छावा' सिनेमावरील प्रेमाने विक्की भारावला आहे. त्यांने प्रेक्षकांंचे आभार मानले आहेत. खास पोस्ट लिहित त्याने 'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' असं म्हटलं आहे. आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मेसेजेस, व्हीडिओज पाहत असल्याचं तो म्हणाला आहे. Chhaava Box Office Collection: पहिल्याच दिवशी 'छावा'ची दमदार कमाई करत मोडले अनेक विक्रम .
विक्की कौशलची पोस्ट
छावा, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 14 फेब्रुवारी रोजी रिलीज झाल्यानंतर 2025 मधील हा सर्वात मोठा हिंदी ओपनर बनला आहे. 'लिडिंग मॅन' म्हणूनही हा सिनेमा सर्वात मोठी ओपनिंग आहे. पहिल्या दिवशी छावाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 31 कोटी रुपयांची कमाई केली. छावा येण्यापूर्वी, अक्षय कुमार आणि वीर पहारिया च्या स्काय फोर्सने 15.3 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह 2025 मधील सर्वात मोठ्या हिंदी ओपनिंगचा विक्रम केला होता.
छावाचं बॉक्स ऑफिस वर दमदार यश
छावा बद्दल खास बाब म्हणजे विक्की कौशलच्या शेवटच्या सहा रिलीज सिनेमाच्या एकत्रित एकूण कलेक्शन इतके ओपनिंग एकट्या 'छावा' सिनेमाला पहिल्याच दिवशी मिळाले आहे. विक्की च्या सॅम बहादूर ने 5 कोटी, द ग्रेट इंडियन फॅमिली 1 कोटी, जरा हटके जरा बचके 5 कोटी, भूत पार्ट वन: द हॉन्टेड द यू 5 कोटी, द इव्हन ब्रॅक 5 कोटी आणि सर्जिकल स्ट्राइक ने 8 कोटी रुपये कमावले आहेत.