Lavani inside Pune's Lal Mahal Incident: पुण्याच्या लाल महालात लावणी करणं पडलं महागात; Vaishnavi Patil सह चौघांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या लाल महालात लावणी करणं डान्सर वैष्णवी पाटीलला (Vaishnavi Patil) महागात पडलं आहे. पुण्याच्या फरासखाना पोलिसांकडून (Faraaskhana PS) वैष्णवी पाटील सह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लाल महालात लावणी केल्याने भावना दुखावल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडने कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार कलम 295, 186 अंतर्गत करवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील लाल महाल हा सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे क पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमी लाल महालात जाऊ शकत नसताना या लाल महालामध्ये एका चित्रपटातील लवणीच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक समोर आल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांमधून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान वैष्णवीने या प्रकाराची चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मीडीयामधून माफीनामा देखील जाहीर केला आहे.

वैष्णवी पाटील ची माफी

16 एप्रिल 2022 दिवशी वैष्णवीने लाल महालात व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर बघता बघता तो वायरल झाला. वैष्णवीची रील ही चंद्रमुखी चित्रपटातील 'चंद्रा' या गाण्यावर होती. नक्की वाचा: Amruta Khanvilkar Dance in Metro: पुणे मेट्रोत अभिनेत्री अमृता खानविलकरने धरला 'चंद्रा' गाण्यावर ठेका, पहा व्हिडिओ.

दरम्यान लालमहालात लावणी केल्याच्या घटनेनंतर मराठा महासंघाकडून लाल महाल गोमुत्र, गुलाबपाणी शिंपडून स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच जिजाऊंच्या पुतळ्यावरही दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.

वैष्णवी पाटील ही अनेक हिंदी, मराठी डान्सिंग रिएलिटी शोज मधून समोर आली आहे. लावणी सोबतच तिने शास्त्रीय, उपशास्त्रीय नृत्याच्या कलाविष्कारातून अनेकदा रसिकांचं मन जिंकल आहे. सुपर डान्सर मराठीची ती विजेती होती.